नवी दिल्ली : रिलायन्स जिओने नवी ऑफर आणल्यानंतर इतर कंपन्यांनीही ऑफर देणं सुरु केलं आहे. एअरटेलनंतर आता व्होडाफोननेही नव्या ग्राहकांसाठी 244 रुपयांचा खास प्लॅन आणला आहे. ज्याची व्हॅलिडिटी 70 दिवसांची असेल.
या प्लॅननुसार ग्राहकांना दररोज 1 GB डेटा देण्यात येईल म्हणजेच 70 दिवसांसाठी 70 GB डेटा मिळेल. पहिल्या रिचार्जवरच ही ऑफर मिळणार आहे. त्यामुळे अर्थातच फक्त नव्या ग्राहकांसाठी ही ऑफर असेल.
दुसऱ्यांदा रिचार्ज केल्यास या ऑफरची व्हॅलिडिटी केवळ 35 दिवसांसाठी असेल. मात्र 70 GB एवढाच डेटा दिला जाईल आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगही मिळणार आहे.
व्होडाफोनने याशिवाय 346 रुपयांची ऑफरही आणली आहे. ज्याची व्हॅलिडिटी 56 दिवसांची असेल. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 3G/4G डेटा मिळेल.
व्हॉईस कॉलिंगसाठी मर्यादा ठेवण्यात आली आहे. एका दिवसात 300 मिनिटे वापरता येतील, तर आठवड्यात 1200 मिनिटांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. तर व्होडाफोन अॅपवरुन रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना 5 टक्के कॅशबॅकही मिळेल.
(नोट : संबंधित ऑफरनुसार रिचार्ज करण्यापूर्वी तुमच्या नंबरसाठी ही ऑफर आहे किंवा नाही याची कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवरुन खात्री करा)