मुंबई: जिओच्या 'धन धना धन' ऑफरनंतर आता टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आता आपल्या यूजर्सला 4 जीबी डेटा फ्री देणार आहे. जर यूजर्सनं आपलं सिमकार्ड व्होडाफोन 4जी सुपरनेट सिममध्ये अपग्रेड केल तर कंपनीकडून त्याला 4 जीबी डेटा मोफत मिळणार आहे. मुंबईतील यूजर्ससाठी ही खास ऑफर आहे.
व्होडाफोननं जारी केलेल्या पत्रकात असं म्हटलं आहे की, 'व्होडाफोन 4G सिम यूजर्सला व्होडाफोन स्टोअर्स आणि व्होडाफोन मिनी स्टोअर्सवर मिळेल. त्यामुळे यूजर्स सिम कार्ड अपग्रेड करुन 4 जीबी डेटा मोफत मिळवू शकतात.
सिम कार्ड अपग्रेड झाल्यानंतर व्होडाफोनच्या प्रीपेड ग्राहकांना 4 जीबी डेटा फ्री मिळणार आहे. 10 दिवसांपर्यत ही ऑफर वैध असणार आहे. तर पोस्टपेड यूजर्स हा फ्री डेटा आपल्या पुढल्या बिल सर्कल पर्यंत वापरु शकतो.
जिओच्या 'धन धना धन' ऑफरनंतर व्होडाफोननं ही नवी ऑफर आज (बुधवारी) लाँच केली. सप्टेंबरपासून जिओनं टेलीकॉम सेक्टरमध्ये आपली छाप पाडली आहे. त्यामुळे इतर टेलीकॉम कंपन्यांनी आपल्या डेटाच्या किंमतीत कपात केली आहे. तसेच काही नवे टेरिफ प्लानही लाँच केले आहेत.