मुंबई: वोडाफोन यूके आणि हुवाई या दोघांच्या सहकार्याने मोबाईल क्षेत्रातील 45.G (टीडीडीप्लस)सोबत एलटीई टीडीडी तंत्रज्ञानची चाचणी करीत आहे. यामुळे शहरी भागातील 4G नेटवर्कची क्षमता वाढणार आहे. या चाचणीसोबतच 2020पर्यंत 5G ची तयारीही कंपनीने सुरु केली आहे.


 

वोडाफोन यूकेचे मुख्य अभियंते जॉर्ज फर्नांडिजने सांगितले, ''आगामी पाच वर्षांमध्ये देशात 5G तंत्रज्ञान येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही रोडिओ नेटवर्कच्या सहकार्याने नेटवर्किंगमधील भविष्यातील समस्या दूर करण्यासाठी काम करत आहोत. यासोबतच आम्ही ब्रिटेनमधील उपभोक्त्यांसाठी 4G नेटवर्कमध्ये सातत्याने सुधारणा करत आहे.''

 

या नव्या तंत्रज्ञानाचे परिक्षण मॅनचेस्टरमध्ये सुरु आहे. हे तंत्रज्ञान नव्या पीढिच्या स्मार्टफोनच्या आगमनासोबत व्हिडीओ आणि आभासी विश्व सामग्रीचा प्रयोगासाठी सहकार्य होईल.

 

पारंपरिक पद्धतीने मोबईल सिग्नलला बेस स्टेशनपासून मोबाईल उपकरणपर्यंत पोहचवले जाईल. मात्र, या नव्या तंत्रज्ञानाने चोहूबाजूने रिसीव्हरचा प्रयोग केला जाऊ शकतो. ज्याने दुर्गम क्षेत्रातही मोबाईल वापरात अडचणी येणार नाहीत.