- 4.5 इंच आकाराची स्क्रिन
- 1.2 GHz क्वाड कोअर प्रोसेसर
- 1 GB रॅम, 16 GB इंटर्नल स्टोरेज
- 5 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 2 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 5.1 लॉलिपॉप ओएस
शानदार फीचर्स, 10 हजारांपेक्षाही कमी किंमत, VIVO चा नवा फोन लाँच
एबीपी माझा वेब टीम | 24 Aug 2016 02:35 PM (IST)
नवी दिल्लीः VIVO ने नवा 4G स्मार्ट Y21L लाँच केला आहे. हा फोन Y21 या फोनचा अपग्रेडेड व्हर्जन आहे. या फोनची किंमत 7 हजार 490 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. बाजारात हा फोन व्हाईट आणि ग्रे कलर्समध्ये उपलब्ध आहे. VIVO च्या V3 आणि V3 मॅक्स या फोनची बाजारात दमदार विक्री सुरु आहे. त्यातच कंपनीने हा मिड बजेट फोन आणून ग्राहकांना सरप्राईज दिलं आहे. त्यामुळे ग्राहकांना हा फोन कसा वाटतो, याकडे लक्ष लागलं आहे. काय आहेत फीचर्स?