मुंबई : फेसबुकवर ऑटो प्ले व्हिडीओ यूझर्ससाठी मोठी समस्या बनली आहे. याचं कारण व्हिडीओ प्ले होतो. मात्र, आवाजासाठी व्हिडीओ साऊंडवर टॅप करावा लागतं. यूझर्सच्या समस्या गांभीर्याने घेत फेसबुकने यावर उपाय शोधण्याचे प्रयत्नही सुरु केले आहेत. ऑटो प्ले व्हिडीओ टेस्टिंग सुरु केलं आहे. सध्या हे फीचर काही निवडक यूझर्ससाठी उपलब्ध होणार आहे. मात्र, टेस्टिंग यशस्वी झाल्यास सर्व फेसबुक यूझर्सासाठी हे नवं फीचर उपलब्ध करुन दिलं जाईल.
2013 साली फेसबुकने ऑटो प्ले फीचर सुरु केलं. त्यानुसार फेसबुक स्क्रोल केल्यानंतर व्हिडीओ प्ले होतं. मात्र, व्हिडीओ ऑटो प्ले होत असला, तरी आवाज येत नव्हता. त्यावर मॅन्युअली टॅप करावा लागतो. यावर उपाय म्हणून फेसबुक टेस्टिंग करत आहे.
फेसबुकच्या प्रवक्त्यांनी ‘मॅशेबल ऑस्ट्रेलिया’शी बोलताना, आम्ही न्यूज फीडमध्ये एक छोटासा बदल करणार आहोत. व्हिडीओ ऑटो प्ले होत असताना आवाजही येईल. मात्र, ज्यांना आवाज नको असेल, त्यांना सेटिंगमध्ये जाऊन आवाज बंद करण्याची सुविधाही दिली जाईल. फेसबुकवरील व्हिडीओ आवाजासह अनुभवता यावं, यासाठी हा प्रयत्न करतो आहोत.
फेसबुकवरील व्हिडीओ पाहणाऱ्यांची संख्या कोटींमध्ये आहे. मात्र, काही जणांना ऑटो प्ले व्हिडीओ फीचरचा त्रासही होतो. याचं प्रमुख कारण म्हणजे व्हिडीओ तर प्ले होतो. मात्र, त्याला आवाज नसतो.
फेसबुकने ऑटो प्ले व्हिडीओसोबत आवाजाचं फीचर जोडल्यास, त्याचा एक दुष्परिणाम असा होईल की, सार्वजनिक ठिकाणी यूझर्सना त्याचा त्रास होऊ शकतो. मात्र, ऑटो प्ले डिसेबल करण्याची सुविधाही फेसबुककडून देण्यात येणार आहे.