Vivo V25 Pro 5G Launch: चीनी स्मार्टफोन ब्रँड Vivo लवकरच आपला नवीन स्मार्टफोन Vivo V25 Pro 5G भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. Vivo ने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केली नसली तरी हा फोन लवकरच भारतीय बाजारात दाखल होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. बीआयएस वेबसाइटनुसार, कंपनी लवकरच हा फोन बाजारात उतरणार आहे. Vivo V25 Pro 5G स्मार्टफोन Vivo S15 Pro चा Rebranded Version असेल. जो Vivo ने अलीकडेच सादर केला आहे. या फोनच्या चायनीज व्हेरिएंटमध्ये 120Hz चा रिफ्रेश दर आणि MediaTek Dimensity 8100 प्रोसेसर आहे.


Vivo V25 Pro 5G मध्ये मिळू शकतात हे फीचर्स 



  • Vivo V25 Pro 5G 6.56-इंच फुल एचडी प्लस Samsung E5 AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेटसह येऊ शकतो.

  • Vivo V25 Pro 5G फोनमध्ये Octacore MediaTek Dimensity 8100 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.

  • Vivo V25 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 12 GB RAM सह 256 GB UFS 3.1 स्टोरेज मिळू शकते.

  • Vivo V25 Pro 5G मध्ये तीन रियर कॅमेरे मिळू शकतात. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX766V सह येऊ शकतो.

  • Vivo V25 Pro 5G मध्ये 4,500mAh बॅटरी दिली जाऊ शकते. जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

  • कनेक्टिव्हिटीसाठी, Vivo V25 Pro 5G मध्ये 5G, 4G, GPS, 3.5mm हेडफोन जॅक, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.2, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स दिले जाऊ शकतात.


Vivo V25 Pro 5G ची अपेक्षित किंमत


BIS वेबसाइटनुसार, Vivo V25 Pro 5G ला Vivo S15 Pro च्या चायनीज व्हेरिएंटच्या किमतीवर लॉन्च केला जाऊ शकतो. चीनमध्ये Vivo S15 Pro च्या 8 GB RAM + 256 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 3,399 युआन (सुमारे 39,000 रुपये) आणि 12 GB RAM + 256 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 3,699 युआन (सुमारे 42,600 रुपये) आहे. असा अंदाज आहे की, या किंमतीत Vivo V25 Pro 5G भारतीय बाजारात लॉन्च केला जाऊ शकतो.