मुंबई : सोनी इंडियानं आज एक नवा फूल-फ्रेम 'ए7 आर3' इंटरचेंजेबल मिररलेस कॅमेरा भारतात लाँच केला आहे. याची किंमत तब्बल 2,64,990 रुपये आहे. या कॅमेऱ्यात हाय-रेझ्युलेशन 42.4 मेगापिक्सल आहे. याचं शूटिंग स्पीड 10 फ्रेम प्रति सेकंद आहे.


या कॅमेऱ्यात 4K व्हिडीओ क्वॉलिटी, वाइड डायनामिक रेंज आणि नोयॉज रिडक्शन यासारखे फीचरही देण्यात आले आहेत. हा कॅमेरा लाइव्ह यू मोडमध्ये सलग 8 फ्रेम प्रति सेकंद एवढ्या वेगानं शूट करु शकतो.

हा कॅमेरा 'इमेजिंग एज' सॉफ्टवेअर सुईटसोबत येणार आहे. जे यूजर्सला प्री-प्रोसेसिंगपासून पोस्ट-प्रोसेसिंगपर्यंत मदत करतं. या कॅमेऱ्याच्या बॅटरी लाइफमध्ये पहिल्यापेक्षा अधिक सुधारणा करण्यात आली आहे.

या कॅमेऱ्यात वाय-फाय हे फीचरही असणार आहे. ज्याच्या मदतीनं स्मार्टफोन, टॅबलेट, कम्प्युटर किंवा एफटीपी सर्व्हरमध्ये अगदी सहजपणे फाइल ट्रान्सफर करता येईल.