सॅन फ्रान्सिस्को : सोशल मीडियाच्या प्रांतात फेसबुक आणि ट्विटरची स्वत:ची अशी खास ओळख आहे आणि हे दोन्ही व्यासपीठ सोशल मीडियातले जायंट मानले जातात. फेसबुक म्हणजे मनात आहे ते सर्व किंवा जे सांगायचंय ते सर्व कितीही शब्दात, कितीही फोटो वापरुन शेअर करण्याचं व्यासपीठ, तर ट्विटर म्हणजे '140 कॅरेक्टर्स लिमिट' शेअरिंगचं व्यासपीठ. मात्र ट्विटरची '140 कॅरेक्टर्स'ची ओळख आता पुसली जाणार आहे.
सध्या ट्विटरच्या 'What's happening'च्या स्पेसमध्ये केवळ 140 कॅरेक्टर्समध्येच व्यक्त होता येतं. मात्र यापुढे व्यक्त होण्यासाठी कॅरेक्टर्स मर्यादा वाढवण्यात येणार आहे. 140 वरुन 280 कॅरेक्टर्स म्हणजे आताच्या संख्येच्या बरोबर दुप्पट कॅरेक्टर संख्या केली जाणार आहे. त्यासाठी ट्विटरकडून टेस्टिंगही सुरु झाली आहे.
ट्विटरने विशिष्ट ग्रुपमध्ये 280 कॅरेक्टर्सचा प्रयोग करुन पाहिला. त्याआधी ट्विटरकडून संशोधनही करण्यात आलं. विशेषत: जपानी आणि इंग्रजी भाषेबाबत तुलना करुन ट्विटरने हा कॅरेक्टर मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्विटरने या नव्या टेस्टिंगबाबत माहिती देण्यासाठी एक ट्विट केला आहे. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये त्यांनी 220-225 कॅरेक्टर्स वापरले आहेत. कॅरेक्टर्स लिमिटमध्ये होऊ घातलेल्या नव्या बदलाची माहिती देणाऱ्या ट्विटमध्येच ट्विटरने टेस्टिंग केले आहे.
आलिया रोझन यांनी ब्लॉग लिहूनच यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. आलिया रोझन या ट्विटरच्या प्रोड्युसर मॅनेजर आहेत. कॅरेक्टर्स लिमिट वाढवण्यामागची भूमिका आलिया रोझन यांनी ब्लॉगमधून मांडली आहे.
इंग्रजीमध्ये ट्वीट करताना जेवढे कॅरेक्टर्स ट्विटर स्वीकारतो, तेवढेच कॅरेक्टर्स इतर भाषांमध्ये स्वीकारत नाही. उदाहरणादाखल आपण मराठी भाषेबाबत विचार करु शकतो. मराठीत काना, मात्रा, वेलांटी यांमुळे कॅरेक्टर्स संख्या कमी होते. त्यामुळे एक किंवा फार फार तर दोन वाक्य ट्विटरवर एकावेळी शेअर करता येतात. कधी कधी तेही पूर्ण होत नाहीत. त्यावेळी मात्र काट-छाट करावी लागते. ट्विटरने कॅरेक्टर्स लिमिट वाढवण्याचा विचार अशाच भाषांमुळे केला आहे. ज्यामुळे सर्व भाषिकांना कमी शब्दांत, मात्र नीट व्यक्त होता येईल.
नव्या बदलाची माहिती देणारं ट्विवटरचं ट्वीट :
https://twitter.com/Twitter/status/912783930431905797?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=http%3A%2F%2Ftimesofindia.indiatimes.com%2Fbusiness%2Finternational-business%2Ftwitter-aims-to-boost-appeal-with-new-280-character-tweet-limit%2Farticleshow%2F60849411.cms
ट्विटरची '140 कॅरेक्टर'ची मर्यादा लवकरच हद्दपार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Sep 2017 08:01 AM (IST)
ट्विटरने या नव्या टेस्टिंगबाबत माहिती देण्यासाठी एक ट्विट केलाय. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये त्यांनी 220-225 कॅरेक्टर्स वापरले आहेत.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -