नवी दिल्ली : विमान प्रवासात मोबाईलवर बोलणं आता शक्य होणार आहे आणि भारतसुद्धा हवाई वाहतुकीदरम्यान फोनवरुन बोलू शकणाऱ्या देशांच्या यादीत सहभागी होणार आहे.

भारतीय हवाईहद्दीत वायफायद्वारे मोबाईलच्या वापराला ट्रायनं मान्यता दिली आहे. या हद्दीत अरबी समुद्र आणि पश्चिम बंगालच्या महासागराचाही समावेश आहे. त्यामुळे लवकरच भारतीय विमान प्रवाशांना विमानातून प्रवास करताना फोनवर बोलता येणार आहे.

तसेच त्यांना मोबाईलवरुन मेसेजही करता येईल आणि इंटरनेट डेटाही वापरता येईल. विमान प्रवासात मोबाईलचा वापर होऊ की नये याबाबत खुली झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रायने सांगितले.