'या' नव्या मोबाईलची किंमत फक्त 315 रुपये!
एबीपी माझा वेब टीम | 20 Jan 2018 01:29 PM (IST)
ऑनलाइन रिटेलर शॉपक्लूजने फक्त 315 रुपये किंमतीचा iKall K71 हा फोन लाँच केला आहे.
मुंबई : मोबाईल कंपन्यांमध्ये स्वस्त फोनसाठी सध्या बरीच स्पर्धा सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच Viva V1 हा स्वस्त फोन लाँच करण्यात आला होता. त्यानंतर आता ऑनलाइन रिटेलर शॉपक्लूजने फक्त 315 रुपये किंमतीचा iKall K71 हा फोन लाँच केला आहे. iKall K71 या फोनमध्ये सिंगल सिम सपोर्ट देण्यात आलं आहे. यामध्ये 1.4 इंच स्क्रिन देण्यात आली असून यामध्ये मोनोक्रोम डिस्प्ले आहे. तसेच यामध्ये एलईडी टॉर्चही आहे. या फोनमध्ये 800 mAh बॅटरी देण्यात आली आहे. 315 रुपये किंमतीचा हा फोन एका मर्यादित कालावधीपर्यंतच ऑफरमध्ये उपलब्ध असणार आहे. हा फोन आउट ऑफ स्टॉक झाल्यास या ऑफरचा लाभ ग्राहकांना घेता येणार नाही. काही दिवसांपूर्वीच Viva V1 फोन लाँच करण्यात आला होता. त्याची किंमत 349 रुपये आहे.