नवी दिल्ली: भारती एयरटेलच्या वापरकर्त्यांच्या संख्येत नोव्हेंबर महिन्यात तब्बल 43.7 लाखांची वाढ झाल्याचं दिसून आलंय. त्यानंतर रिलायन्स जियोचा नंबर लागत असून नोव्हेंबर महिन्यात 19.36 लाख वापरकर्त्यांची वाढ झाली आहे. ट्रायच्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.
एयरटेलच्या 43.7 लाख नव्या वापरकर्त्यांमुळे आता या कंपनीची ग्राहक संख्या ही 33.46 कोटी इतकी झाली आहे. तर रिलायन्स जियो हे ग्राहकांच्या संख्येत देशात पहिल्या क्रमांकावर असून त्याच्या ग्राहकांची संख्या ही 40.82 कोटी इतकी आहे.
नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक फटका व्होडाफोन-आयडीया या कंपनीला बसला असून एकाच महिन्यात 28.9 लाख ग्राहकांनी या कंपनीला रामराम करुन इतर कंपन्यांकडे आपला मोर्चा वळवल्याचं दिसून आलंय. इतक्या मोठ्या संख्येने ग्राहकांनी साथ सोडल्यानंतर व्होडाफोन-आयडीयाच्या वापरकर्त्यांची संख्या आता 28.99 कोटी इतकी झाली आहे.
BSNL, Airtel आणि Jio कंपनीच्या दीर्घ वैधतेसह फ्री कॉलिंगच्या बेस्ट ऑफर्स
ऑक्टोबर 2020 ते नोव्हेंबर 2020 या दरम्यान भारतातील टेलिफोन ग्राहकांची संख्या ही 11 लाख 75 हजार इतकी म्हणजे 0.30 टक्क्यांनी वाढली. यामध्ये शहरी ग्राहक हे 6 लाख 48 हजार तर ग्रामीण ग्राहक हे 5 लाख 26 हजार इतके आहेत. भारतातील टेलीडेन्सिटी ही 86.38 वरुन आता 86.56 इतकी झाली आहे.
ट्रायच्या आकडेवारीनुसार 83.83 टक्के ग्राहक हे अॅक्टिव्ह आहेत. यामध्ये भारती एयरटेलचे सर्वाधिक म्हणजे 96.63 टक्के ग्राहक हे अॅक्टिव्ह आहेत.
भारतातील टॉपच्या पाच कंपन्या या 98.84 टक्के ब्रॉडबॅन्ड बाजारपेठ व्यापतात. त्यामध्ये रिलायन्स जियो 4 लाख 10 हजार, भारती एयरटेल एक लाख 74 हजार, व्होडाफोन आयडीया एक लाख 20 हजार तर सार्वजनिक कंपनी BSNL ही 26 हजार ग्राहकांपर्यंत पोहोचली आहे.
TRP scam : टीआरपी मार्गदर्शक तत्वांच्या पुनरावलोकनासाठी केंद्र सरकारकडून समिती स्थापन