मुंबई : स्वत:चं वाहन असावं असं प्रत्येकाचं स्वप्न. मुळात वाहन खरेदी करण्याची सुरुवातच होते या स्वप्नापासून. असं हे स्वप्न सत्यात उतरवत असताना म्हणजे प्रत्यक कार खरेदी करत असताना बरेच निकष विचारात घेतले जतात. यामध्ये कारच्या इंजिनपासून ते अगदी त्यामध्ये असणाऱ्या बैठक व्यवस्थेचाही अंदाज घेतला जातो. सध्या असाच एक ट्रेंड बाजारात स्थिरावला आहे.


ऑटो क्षेत्रात स्थिरावलेला हा ट्रेंड आहे ऑटोमॅटिक कारचा. ऑटोमॅटिक कारची वाढती मागणी पाहता अनेक कंपन्यांनी त्यांच्या लोकप्रिय मॉडेलमध्ये याच कार्यप्रणालीचा वापर केल्याचं पाहायला मिळत आहे. सहजा ऑटोमॅटिक कार प्रिमियम सेगमेंटमध्ये येत असल्यामुळं त्यांची किंमत जास्त असते. पण, ता परवडणाऱ्या किंमतीतही ही कार उपलब्ध असणार आहे. मारुती, ह्युंडाई, रेऩॉल्ट अशा अनेक लो बजेट कारमध्ये तुम्हाला हे पर्याय उपलब्ध असतील. त्यामुळं नव्या वर्षात एखादी कार खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर हे पर्याय नक्की पाहा....


Maruti Suzuki Celerio- मारुती कंपनीच्या कारना भारतात बरीच पसंती आहे. आता या कंपनीच्या अनेक कमी किंमतीच्या कारमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक फिचर मिळतील. ज्यामध्ये सध्या मारुती सुझुकी सेलेरिओ या कारला बरीच मागणी आहे. सेलेरिओमध्ये 998 सीसीचे 3 सिलेंडर असणारं इंजिन आहे. जे, 50 केडब्ल्यूची पॉवर आणि 90 एनएम टॉर्क जनरेट करतं. या कारमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे. याची शोरुममधील किंमत 5,13,138 रुपये आहे.


Maruti Suzuki Alto- मारूतीच्या स्वस्त आणि टीकाऊ कारमध्ये येणारं आणखी एक नाव म्हणजे ऑल्टो. ऑटोमॅटिक व्हर्जनमध्ये येणाऱ्या या कारमध्ये 998 सीसीचं इंजिन असून ते 50 केडब्ल्यूची पॉवर आणि 90 एनएम टॉर्क जनरेट करतं. या कारची शोरुममधील किंमत आहे 4,43,559 रुपये.


Hyundai Santro-  स्वस्त ऑटोमॅटिक कारमध्ये येणारं आणखी एक नाव म्हणजे ह्युंडाई सँट्रो. बऱ्याच काळापासून ही कार लोकप्रिय आहे. या कारला 1.1 लीटरचं 3 सिलेंडर असणारं इंजिन देण्यात आलं आहे. जे 69 पीएस पॉवर आणि 101 चं टॉर्क जनरेट करतं. ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असणाऱ्या या कारची शोरूममधील किंमत 525,990 इतकी आहे.


Renault Kwid RXL Easy-R-  रिनॉल्ट क्विडच्या गुणविशेषांबाबत सांगावं तर, या कारमध्ये पॉवर स्टीअरिंग, फ्रंट पॉवर विंडो, एअर कंडीशनर, युएसबीसह सिंगल DIN म्यूझिक सिस्टीम, ब्ल्यूटूथ, Aux कनेक्टिविटी, सेन्ट्रल लॉकिंग, की-लेस एंट्री, फुली डिजिटल इंस्ट्रूमेंट पॅनल, ड्राइवर साइड एयरबॅग, ABS, EBD, रिवर्स पार्किंग सेंसर, स्पीड अलर्ट आणि 279-लीटर बूट स्पेस देण्यात आला आहे. या कारमध्ये तुम्हाला 1.0 लीटर, 999 सीसीचं ट्रीपल सिलेंड इंजिन मिळतं. जे 67 बीएसपीची मॅक्सिमम पॉवर आणि 91 एनएमचं पीर टॉर्क जनरेट करतं. सोबतच या कारमध्ये या इंजिनासह  Easy-R AMT 5-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्सही देण्यात येतो. यामध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनचाही पर्याय उपलब्ध आहे. या कारची एक्स शोरुम किंमत 4.54 लाख रुपये इतकी आहे.