Telegram News Feature : Whatsapp चं सिक्युरिटी अपडेट आल्यानंतर अनेकांनी Whatsapp अॅप डिलिट करुन वेगळा पर्याय निवडला. आता अनेकांना Whatsapp सो़डून सिग्नल (Signal) आणि टेलिग्राम (Telegram) अॅप्स वापरण्यास सुरुवात केली आहे. कमी वेळात या दोन्ही अॅप्सना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र काहीजण अद्यापही व्हॉट्सअॅप सोडावं का? याबाबत संभ्रमावस्थेत आहेत. याला कारण म्हणजे व्हॉट्सअॅपमध्ये असलेल्या त्यांचे चॅट्स आणि इतर डेटा.


मात्र तुम्हीही याच कारणामुळे व्हॉट्सअॅप सोडू शकत नाहीत, तर टेलिग्रामने यावर उपाय शोधला आहे. टेलिग्रामने नवं अपडेट iOS वर जारी केलं आहे. या नव्या अपडेटमुळे यूजर व्हॉट्सअॅप आणि इतर अॅप्समधून सहज चॅट्स आणि इतर डेटा इम्पोर्ट करता येणार आहे. यासाठी तुम्हाला टेलिग्रामचं मायग्रेशन टूल वापरावं लागणार आहे. या टूलची माहिती Telegram 7.4 अपडेटमध्ये देण्यात आली आहे.


मात्र काही यूजर्सच्या माहितीनुसार टेलिग्रामच्या 7.4 1 मध्येही मायग्रेशन टूल उपलब्ध आहे. त्यातूनही व्हॉट्सअॅपचे चॅट सहज इम्पोर्ट करता येणार आहेत. त्यामुळे या नव्या अपडेटच्या मदतीने अनेक यूजर्स टेलिग्रामशी जोडले जाण्याची शक्यता आहे. कंपनीच्या मते या नव्या अपडेटमुळे टेलिग्राम यूजर्सची संख्या वाढण्यात मदत होणार आहे.


माइग्रेशन टूल कसं काम करतं?


1- जे व्हॉट्सअॅप चॅट मायग्रेट करायचे आहेत ते उजवीकडून डावीकडे स्वाईप करा.
2- तेथे More पर्यायावर जावे लागेल. तेथे दिलेल्या Export Chat च्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
3- एका पॉप अपद्वारे विचारलं जाईल की आपणास चॅट अटॅचमेंटसह किंवा चॅट अटॅचमेंटविना एक्सपोर्ट करायचे आहे.
4- टेलीग्राममध्ये iOS शेअर शीटने हे इम्पोर्ट करता येणार आहे. त्यानंतर यूजरला टेलिग्राम निवडावे लागेल.
5- त्यानंतर Contact किंवा Group निवडण्यास सांगितले जाईल. आता तुम्हाला ज्या चॅटला मायग्रेट करायचे आहे, कॉन्टॅक्ट चॅटमध्ये तुमची मेसेज हिस्ट्री सिंक होईल.
6- इतर कोणत्या अ‍ॅप वापरत असल्यास, टेलीग्रामच्या खाली एक फ्लॅग मेसेज येईल ज्यामध्ये इम्पोर्डेड लिहिले असेल.
7- हे फिजर पर्सनल कॉन्टॅक्ट आणि ग्रुप दोघांसाठी काम करते. इम्पोर्ट केलेल्या चॅटवर ओरिजनल टाईम स्टॅम्प आणि इम्पोर्टेड लिहिलेलं असेल.


टेलीग्रामने सध्या iOS अपडेट नोटमध्ये याचा उल्लेख केला आहे. या व्यतिरिक्त, मायग्रेशन टूलचा इतर कुठेही ऑफिशियल उल्लेख नाही. मात्र Android फोनसाठी हे टूल कधी येईल हे सध्या माहित नाही.