नवी दिल्ली : सोशल मेसेजिंग अॅप WhatsApp सध्या आपल्या नवीन प्रायव्हसी धोरणावरुन चर्चेत आहे. अलीकडेच, व्हॉट्सअॅपने आपल्या वापरकर्त्यांना नवीन गोपनीयता धोरण मंजूर करावे किंवा व्हॉट्सअॅप सोडायला सांगितले, त्यानंतर त्याचे वापरकर्ते या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. नवीन प्रायव्हसीसी पॉलिसी जाहीर झाल्यानंतर सोशल मेसेजिंग अॅप टेलीग्रामने व्हॉट्सअ‍ॅपला मजेशीर पद्धतीने ट्रोल केलं आहे.


टेलिग्रामने यापूर्वी दोन स्पायडर मॅन मीम शेअर करुन व्हॉट्सअ‍ॅपची थट्टा केली होती. आता टेलिग्रामने दुसर्‍या मीमद्वारे व्हाट्सएपची थट्टा केली आहे. टेलिग्रामने घानाच्या त्या व्हायरल व्हिडिओची एक जीआयएफ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे, ज्यात चार लोक ताबूत (मृतदेहाची पेटी) घेऊन नाचताना दिसत आहेत. यात टेलीग्रामने ताबूतऐवजी व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीचा मजकूर बदलला आहे. वास्तविक घानामध्ये पॉलबियरचा एक गट आहे, जे अंत्यसंस्कारात सादरीकरण करतात.




टेलिग्रामने 10 जानेवारीला हे ट्विट केले असून आतापर्यंत दोन लाख 83 हजाराहून अधिक लाईक्स मिळाल्या असून सुमारे 87 हजार वेळा रिट्वीट झाले आहेत. एवढेच नव्हे तर सुमारे 8 हजार लोकांनीही या ट्विटवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.


विशेष म्हणजे व्हॉट्सअ‍ॅपटी नवीन प्रायव्हसीसी पॉलिसी ज्यांनी स्वीकारली आहे, अशा लोकांनाही टेलिग्रामने खास प्रतिक्रिया दिली. वापरकर्त्याने मीमद्वारे धोरण स्वीकारलेल्या लोकांची स्थिती दर्शविली आहे. युजरच्या ट्वीटवर टेलिग्रामने व्हॉट्सअ‍ॅप अनइन्स्टॉल करण्याचा पर्याय सुचवला आहे आणि या आजारावर हाच उपचार असल्याचे सांगितले आहे. या ट्विटवर आलेल्या युजर्सच्या टिकेवर टेलीग्रामने खास प्रतिक्रिया दिली आहे.


pic.twitter.com/6eGm2emsYx




व्हॉट्सअॅपकडून स्पष्टीकरण

व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन प्रायव्हसी धोरण पुढील महिन्यात 8 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. परंतु वापरकर्त्यांचा विरोध पाहता व्हॉट्सअ‍ॅपनेही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. व्हॉट्सअॅपने स्पष्ट केले आहे की व्हॉट्सअॅप किंवा फेसबुक दोन्हीही वापरकर्त्यांचे खाजगी संदेश वाचू शकत नाहीत किंवा व्हॉट्सअॅप तुमचे मित्र व कुटुंबासमवेतचे तुमचे कॉल ऐकू शकत नाहीत. आपण जे काही शेअर कराल ते आपल्याकडे राहील. कारण तुमचे खाजगी मॅसेज एंड टू एंड एन्क्रिप्शनद्वारे संरक्षित केले आहेत. आम्ही ही सुरक्षा दुर्बल होऊ देणार नाही.