मुंबई : वनप्लस ही स्मार्टफोन कंपनी लवकरच 'वन प्लस नॉर्ड'चं स्पेशल एडिशन लॉन्च करणार आहे. कंपनीने सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे. वन प्लस पहिल्यांदाच स्वत:चे स्पेशल एडिशन लाॅन्च करत आहे. परंतु या स्पेशल एडिशन संबंधित अधिक माहिती अद्यापही समोर आलेली नाही.
टीझरमध्ये दाखवल्यानुसार हा स्मार्टफोन 14 ऑक्टोबर रोजी लॉन्च होऊ शकतो. यावरून अंदाज लावला जात आहे की, हा नवा स्मार्टफोन सॅन्डस्टोन फिनीश डिझाईन सोबत लॉन्च केला जाईल. स्पेशल एडिशन स्मार्टफोन कंपनीच्या One plus 8T च्या लॉन्च इव्हेंटमध्ये सादर करण्यात येणार आहे. कंपनीचा हा इव्हेंट 14 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे. One plus 8T मध्ये 120Hz चा डिस्प्ले, 48MP क्वॉड रिअर कॅमेरा आणि 4500mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.
असू शकतो ग्लास पॅनल
सध्याचा One plus Nord स्मार्टफोन ग्रे ऑनिक्स आणि ब्लू मार्बल कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये ग्लास बॅक फिनीश देण्यात आली आहे. नवीन One plus Nord स्पेशल एडिशनमध्ये रिअर ग्लास पॅनल ऐवजी स्टॅण्ड स्टोन फिनीश दिली जाऊ शकते किंवा नव्या लिमिटेड एडिशन कलरचा ग्लास पॅनल दिला जाऊ शकतो. दरम्यान अद्याप या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
OnePlus Nord चे स्पेसिफिकेशन्स
OnePlus Nord मध्ये 6.44 इंच फुल एचडी प्लस फ्लुइड एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 90Hz रिफ्रेश रेट इतका आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरासेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 48 मेगापिक्सल प्राइम कॅमेरा, 8 मेगापिक्सल वाइड अँगल, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 5 मेगापिक्सलचा डेफ्थ लेंस असणार आहे. याव्यतिरिक्त सेल्फीसाठी याच्या फ्रंटमध्ये 32 मेगापिक्सल आणि 8 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
किंमत
वनप्लसने नॉर्डच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंट्सची किंमत 27,999 रुपये ठरवली आहे. तसेच 12GB रॅम आणि 256 GB स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंट्सची किंमत 29,999 रुपये असणार आहे. 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिंयटची किंमत 24,999 रुपये एवढी असणार आहे.
अर्ध्या तासात 70 टक्के चार्ज
परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर देण्यात आला आहे. पावरसाठी या फोनमध्ये 4115mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 30T फास्ट चार्जला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की, फक्त 30 मिनिटांमध्ये हा स्मार्टफोन 70 टक्के चार्ज होतो. कनेक्टिविटीसाठी हा फोन 4G व्यतिरिक्त 5G ला सपोर्ट करणार आहे.
[mb]1595912311[/mb]