मुंबई: सुझुकीनं जपानमध्ये नवी स्विफ्ट हॅचबॅक कार लाँच केली आहे. उद्यापासून या कारची विक्री सुरु होणार आहे. ही नवी स्विफ्ट कार भारतासह इतर देशांमध्येही लवकरच0 लाँच करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारासाठी यावर्षी होणाऱ्या जिनेव्हा मोटर शोमध्ये ही कार पेश करण्यात येणार आहे.
जपानमध्ये लाँच झालेली नवी स्विफ्ट कार हियरटेक्ट प्लॅटफॉरवर तयार करण्यात आली आहे. याच्या पहिल्या व्हर्जनझध्ये 1.2 लीटर आणि दुसऱ्या व्हर्जनमध्ये 1.0 लीटर बूस्टरजेट डायरेक्ट इंजेक्ट टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे.
या नव्या कारमध्ये अनेक नवे फीचर उपलब्ध आहेत. सुझुकी मॉडेलमध्ये पहिल्यांदाच ड्यूल सेन्सर ब्रेक सपोर्ट (डीएसबीएस) सिस्टमचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये मोनोकूलर कॅमेरा, लेझर सेन्सर आणि हाय बीम असिस्ट यांनं सुसज्ज आहे. भारतात लवकरच ही नी कार लाँच करण्यात येणार आहे.
सोर्स: कार देखो डॉट कॉम
Source: cardekho.com