मुंबई : एक असं अॅप जे व्हिडीओ कॉलिंगची परिभाषाच बदलून टाकण्याच्या तयारीत आहे. ज्याचं नाव आहे व्हिडओ कॉलिंग अॅप डिओ.


 

डिओ लॉन्चिंगनंतर अवघ्या चारच दिवसात गूगल प्ले स्टोअरमधअये नंबर-1 फ्री अॅपमध्ये लिस्ट झालं आहे. सर्वाधिक डाऊनलोड झालेलं अॅप म्हणून हे अॅप लिस्ट झालं आहे.

 

विशेष म्हणजे गूगल प्ले स्टोअरसोबतच अॅपल प्ले स्टोअरवरही नंबर-1 फ्री अॅप म्हणून हे अॅप लिस्ट झालं आहे.

 

गूगलने आपल्या दरवर्षी होणाऱ्या I/O कॉन्फरन्समध्ये हे अॅप 15 ऑगस्ट रोजी लॉन्च करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार 15 ऑगस्ट 2016 रोजी हे अॅप लॉन्च झालं.

 

व्हिडीओ कॉलिंग अॅप्सना वेगळं वळण देणारं हे अॅप आहे. कारण इतर व्हिडीओ कॉलिंग अॅपपेक्षा अत्यंत छोटं आणि हाताळायलाही सोपं आहे. इंटरनेटच्या सहाय्याने सर्वसाधारण कॉलिंगसारखंच या अॅपवरुनही व्हिडीओ कॉल करु शकता.

 

संबंधित बातमी : स्काईप आणि फेसटाईमला आता गूगलच्या 'डुओ'ची टक्कर