Whatsapp : नागरिकांना आता माय जीओव्ही हेल्प डेस्कच्या माध्यमातून डिजीलॉकर (Digilocker) सुविधा उपलब्ध होणार आहे. या डिजीलॉकर सुविधेअंतर्गत व्हॉट्सॲप अॅक्सेसद्वारे पॅन कार्ड, वाहन चालक परवाना,  आणि अन्य कागदपत्रे डाउनलोड करता येणार आहेत.      


माय जीओव्ही हेल्प डेस्कवर व्हॉट्सॲपद्वारे या सुविधेचा नागरिकांना लाभ घेता येणार आहे.  या सेवेच्या मदतीने नागरिकांना आपली कागदपत्रे घरबसल्या सुरक्षितपणे आणि सहज हाताळता येतील. यामध्ये  पॅन कार्ड , वाहन चालक परवाना,  शैक्षणिक प्रमाणपत्र,  वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC), जीवन विमा- दुचाकी आणि विमा कागदपत्रे डाऊनलोड करता येणार आहेत.  


इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून डिजिलॉकर सर्व्हिसला अ‍ॅक्सेस करण्यासाठी MyGov Helpdesk ला व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे केवळ एक मेसेज सेन्ड करुन डिजीलॉकर सर्व्हिसचा वापर करता येणार आहे. 


माय जीओव्ही हेल्प डेस्कचा लाभ कसा घेणार?
देशभरातील व्हॉट्सॲप वापरकर्ते आपल्या व्हॉट्सॲपवरून  ‘नमस्ते, हाय किंवा  डीजी लॉकर’ असा मेसेज  +91 9013151515 या क्रमांकावर पाठवून या सुविधेचा लाभ घेऊ शकतील.  त्यासाठी तुम्हाला DigiLocker अकाउंट किंवा Cowin सर्व्हिस अ‍ॅक्सेस करायचे की नाही याबाबत विचारणा केली जाईल. DigiLocker निवडल्यावर तुम्हाला विचारले जाईल की खाते आहे की नाही. जर DigiLocker वर तुमचे आधीच अकाउंट असल्यास, तुमचा आधार नंबर टाका. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल, तो एंटर करा. आता तुम्ही जी काही कागदपत्रे आधीच अपलोड केली आहेत, ती तुम्ही येथून डाउनलोड करू शकता. 


मार्च  2020 मध्ये उद्घाटन झाल्यापासून माय जीओव्ही हेल्प डेस्कने  ( यापूर्वीचे माय जीओव्ही कोरोना हेल्प डेस्क) नागरिकांना कोरोनाबाबतची विश्वासार्ह माहिती, लसीकरण नोंदणी आणि लसीकरण प्रमाणपत्र डाऊनलोड करणे यासह अन्य सुविधा उपलब्ध केल्या होत्या. डीजी लॉकरवर आतापर्यंत दहा कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी नोंदणी केली आहे.    


महत्वाच्या बातम्या


WhatsApp Feature : अँड्रॉइड आणि आयफोन यूजर्ससाठी व्हॉट्सअॅपचे नवीन फीचर्स लवकरच, वाचा संपूर्ण माहिती


Madras High Court : मद्रास उच्च न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच व्हॉट्सॲपवर सुनावणी, न्यायालयाची रथयात्रेला सशर्त मंजुरी