मुंबई: सोनीनं आपल्या एक्सपीरिया एक्स झेड य स्मार्टफोनमध्ये भरघोस कपात केली आहे. या स्मार्टफोनवर तब्बल 10 हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे.
सोनीनं Xperia XZ हा स्मार्टफोन मागील वर्षी सप्टेंबरमध्ये लाँच करण्यात आला होता. लाँचिंग वेळी या स्मार्टफोनची किंमत 51,990 रुपये होती. त्यानंतर या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्यात आली होती. त्यानंतर हा स्मार्टफोन 49,900 रुपये किंमतीला उपलब्ध होता.
त्यानंतर आता पुन्हा एकदा या स्मार्टफोनच्या किंमतीत भरघोस कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा स्मार्टफोन 39,990 रुपयांना उपलब्ध आहे. ऑनलॉईन शॉपिंग वेबसाईट अमेझॉनवरुन तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करु शकता.
दरम्यान, कंपनीच्या वेबसाईटवर याची किंमत 41,990 रुपये एवढी आहे. या स्मार्टफोनची मोठी खासियत म्हणजे यामध्ये तीन रिअर कॅमेरे आहेत.
एक्सपीरिया एक्स झेड स्मार्टफोनचे फीचर्स (Sony Xperia XZ):
5.2 इंच फूल एचडी डिस्प्ले आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 4
स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर आणि 3 जीबी रॅम देण्यात आली आहे.
64 जीबी इंटरनल मेमरी
ड्यूल सिम आणि 4जी व्हीओएलटीई
23 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 13 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
बॅटरी 2900 mAh क्षमता
दरम्यान, सोनीनं किंमतीत दिलेली ही सूट कायमस्वरुपी असणार आहे की, तात्पुरती याबाबत कपंनीनं काहीही स्पष्ट केलेलं नाही.