वॉशिंग्टन : तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात की नाही, हे आता फेसबुकवरील पोस्ट किंवा इन्स्टाग्रामवरील फोटोंवरुन कळू शकेल. संशोधकांनी एक असा कम्प्युटर प्रोग्राम तयार केलाय, ज्याद्वारे डॉक्टरांच्या तुलनेत चांगल्या पद्धतीने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे डिप्रेशनचा सुगावा लागू शकतो.
या कम्प्युटर प्रोग्रामद्वारे 70 टक्के डिप्रेस्ड लोकांचा शोध घेणं शक्य होणार आहे.
अमेरिकेतील वर्मोंट विश्वविद्यापीठाच्या क्रिस्टोफर डेनफोर्थ यांच्या माहितीनुसार, "सोशल मीडिया अॅपवर काही लोकांच्या अकाऊंटचं विश्लेषण केल्यानंतर आम्हाला असं निदर्शनास आले की, डिप्रेशनमध्ये असलेल्यांचे फोटो गडद रंगांमध्ये असतात. शिवाय, त्यांच्या फोटोंवर लोकांनी अधिक कमेंटही केलेल्या असतात. अनेकदा यांमध्ये चेहरे स्पष्ट दिसत नाहीत.”
“अनेकदा डिप्रेशनमध्ये असलेले लोक फोटो एडिटिंगवेळी फिल्टरचा वापर करतात, मात्र तेही फोटो ब्लॅक अँड व्हाईट करण्यासाठी वापरतात. डिप्रेशनमध्ये असणाऱ्या व्यक्तींचे पोस्टही इतर व्यक्तींच्या तुलनेत अधिक असतात.”
संशोधकांनी सोशल मीडियाच्या अॅपवरील 166 यूझर्सच्या 43 हजार 950 फोटोंचं निरीक्षण करुन विश्लेषण करण्यासाठी या कम्प्युटर प्रोग्रामचा वापर केला गेला. यामध्ये 71 लोकांच्या वैद्यकीय तपासणीनंतर ते डिप्रेशनमध्ये असल्याचेही निदर्शनास आले. ‘ईपीजे डाटा सायन्स’ या मॅगझिनमध्ये हे संशोधनात्मक विश्लेषण प्रकाशितही झाले आहे.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आता सोशल मीडिया सांगणार, तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात की नाही?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Aug 2017 11:52 AM (IST)
संशोधकांनी एक असा कम्प्युटर प्रोग्राम तयार केलाय, ज्याद्वारे डॉक्टरांच्या तुलनेत चांगल्या पद्धतीने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे डिप्रेशनचा सुगावा लागू शकतो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -