जबरदस्त फीचर्स आणि आकर्षक लूक! Smartron चा पहिला लॅपटॉप लॉन्च
एबीपी माझा वेब टीम | 20 May 2016 09:56 AM (IST)
मुंबई : Smartron या भारतीय स्टार्टअप कंपनीने बाजारात t.book नावाचा लॅपटॉप लॉन्च केला आहे. याच लॅपटॉप प्रकारातील हायब्रिड कम्प्युटर बाजारात सध्या उपलब्ध आहेत, मात्र Smartron च्या लॅपटॉप एवढ्या कमी किंमतीत नाहीत. लॅपटॉप आणि टॅब्लेट या दोन्हींची गरज याच लॅपटॉपमधून पूर्ण होऊ शकते. विंडोंज 10 वर चालणारा t.book लॅपटॉप दिसायला अत्यंत आकर्षक असून, Smartron कंपनीचा हा लॅपटॉप स्पेसिफिकेशन्सच्या दृष्टीनेही वैशिष्ट्यपूर्ण आहे. Smartron च्या नव्या t.book लॅपटॉपचे फीचर्स :
लॅपटॉपच्या लूकही अत्यंत आकर्षक आहे. फ्लिप-स्टँड देण्यात आला असून, हायब्रिड कम्प्युटर असल्यने गरजेनुसार टॅब्लेटचा वापर केला जाऊ शकतो. अॅल्युमिनियम आणि मॅग्निशियमसारख्या मेटलपासून तयार करण्यात आलेली बॉडी आहे. ग्रे आणि ऑरेन्ज या दोन रंगांमध्ये लॅपटॉप उपलब्ध आहे. लॅपटॉपमध्ये यूएसबीसाठी USB 3.0 चे तीन स्लॉट्स देण्यात आले असून, चार्जिंग पॉईंट, मायक्रो-एचडीएमआय पोर्ट, हेडफोन जॅकसोबत लॅपटॉपमध्ये मायक्रोएसडी कार्डसाठी स्लॉटही देण्यात आले आहेत. Smartron कंपनीचा t.book हा लॅपटॉप 39 हजार 999 रुपये किंमतीचा आहे.