मुंबई: जर तुम्ही स्मार्टफोन घेण्याचा विचार करण्याचा विचार करीत असाल तर लक्षात ठेवा की तुम्ही  स्मार्टफोन घेतल्यानंतर त्याची एका महिन्याच्या आत अर्धी किंमत झालेली असते. एका रिसर्चमध्ये ही गोष्ट समोर आली.


 

एका वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, एखाद्या कारच्या किंमतीत एका वर्षात 20 टक्के घट होते. तर स्मार्टफोनमध्ये एका महिन्यात 65 टक्के घट होते.

 

निष्कर्षावरुन असं समजतं की, आयफोन हा अँड्रॉईडपेक्षा अधिक महत्वाचा आहे. आयफोन 4 आपल्या सुरुवातीच्या पाच वर्षानंतरही 39 किंमत टिकवून असतं. तर आयफोन (16 जीबी) बाजारात आल्यानंतर एका वर्षापर्यंत 50 टक्के आपली किंमत टिकवतं.

 



 

सर्वाधिक किंमतीत घट ही सॅमसंग गॅलक्सी एस 4मध्ये पाहायला मिळते. 2014 साली बाजारात आल्यानंतर दोनच महिन्यात या स्मार्टफोनच्या किंमतीचं मूल्य अर्ध झालं होतं.

 

एचटीसी वन एम 9 अँड्रॉईड क्षेत्रात फारच वाईट अवस्था झाली. अवघ्या महिन्याभरात या स्मार्टफोनचं मूल्य 65 टक्क्यांनी कमी झालं होतं. स्मार्टफोनचं  मूल्य अतिशय वेगान कमी होत आहे. कारण की, तंत्रज्ञानाचा वेगानं विकास होत आहे. त्यामुळे अनेक नवनवीन मॉडेल बाजारात येत आहेत.

 

रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की, एखाद्या स्मार्टफोनची लोकप्रियताही त्या मॉडेलला प्रभावित करु शकेत. ज्यामुळे त्याचं मूल्य कमी होऊ शकतं.