मुंबई : स्मार्टफोनमध्ये अनेक असे अॅप्स आहेत की ज्यामध्ये डार्गमोडचा ऑप्शन दिलेला असतो. डार्क मोड व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक मेसेंजर आणि ट्विटरवर उपलब्ध आहे. एवढेच नाही तर गुगलने अँड्रॉइड 10 मध्ये सिस्टीम-वाईड डार्क मोड पर्यायही दिलेला आहे. मोबाईल हाताळताना डार्क मोड चांगला वाटतो, मात्र डार्क मोड ऑप्शन नाजून डोळ्यांसाठी अतिशय धोकादायक ठरू शकतो.


डार्क मोड फीचर स्मार्टफोनच्या विविध अॅप्ससाठी सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. जेव्हा डार्क मोड सुरु असतो, तेव्हा स्मार्टफोनचा डिस्प्ले डार्क किंवा काळा होतो. ज्यामुळे कमी उजेड डोळ्यांमध्ये जातो आणि आपण डोळे थकल्याशिवाय मोबाईल वापरू शकतो. परंतु जेथे दिवसा डार्क मोड चांगला वाटतो तो तेवढाच हानिकारक असतो.


दृष्टी कमकुवत होण्याची शक्यता


आपण आपल्या स्मार्टफोनवर बराच वेळ डार्क मोड वापरत असाल तर नंतर आपले डोळे त्यास अनुकूल होतात आणि एकप्रकारे त्याची सवय लागते. पांढऱ्या रंगाचा मजकूर वाचण्यास चांगला वाटतो. परंतु जेव्हा आपण लाईट मोडमध्ये जातो तेव्हा त्याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो आणि दृष्टीवर त्यांचा परिणाम होऊ लागतो. डार्क मोडचा जास्त प्रमाणात वापर केल्यास डोळ्यांचे आजार होऊ शकतात. प्रकाशापासून डार्क मजकूरावर स्वीच केल्यानंतर आपले डोळे अचानक हा बदल स्वीकार करू शकत नाहीत आणि अशात ब्राइटबर्न स्थितीही उद्भवू शकते.


डोळ्यांना अॅस्टिगमॅटिज्म होऊ शकतो


अमेरिकन ऑप्टोमेट्रिक असोसिएशनच्या मते, अॅस्टिगमॅटिज्म नावाचा आजार डार्क मोड वापरणार्‍या लोकांमध्ये दिसून येत आहे. ज्यामध्ये एका डोळ्याच्या किंवा दोन्ही डोळ्यांच्या कॉर्नियाचा आकार थोडा विचित्र बनतो आणि अस्पष्ट दिसू लागतं. ज्यामुळे लोक पांढर्‍या बॅकग्राऊंडवर काळ्या मजकुराच्या तुलनेत काळ्या बॅकग्राऊंडवर सफेद मजकूर सहज वाचू शकत नाहीत. डिस्प्ले ब्राईट झाल्याने आयरिस लहान होऊ शकतो. ज्यामुळे कमी प्रकाश डोळ्यांमध्ये जातो आणि डार्क डिस्प्लेसह उलट होतं. यामुळे डोळ्यांतील फोकसवर परिणाम होतो.


मोबाईल वापरताना काय घ्याल?


डार्कमोडमुळे डोळ्यांवर काही परिणाम होऊ द्यायचा नसेल तर डार्कमोड आणि लाईटमोड काही काही वेळाने बदलून घ्यावा. जितकं शक्य होईल तितका मोबाईलचा ब्राईटनेस कमी ठेवावा. दिवसा लाईटमोडचा वापर करावा आणि रात्रीच्या वेळी डार्क मोडचा वापर करावा, जेणेकरुन डोळ्यांना त्रास होणार नाही.