Smart Glasses Price : सध्या एआर (AR) आणि व्हीआर (VR) तंत्रज्ञान मुख्यप्रवाहात येत आहेत. त्यामुळे यांच्या तुमच्या दैनंदिन जीवनतील वापर वाढणार आहे. असेच एक उत्पादन म्हणजे स्मार्ट ग्लासेस. तुम्ही आता भारतात स्मार्ट चष्मे खरेदी करू शकता, ज्यामध्ये स्पीकर, कॅमेरा आणि इतरही अनेक वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. भारतात खरेदी करता येणाऱ्या काही सर्वोत्तम स्मार्ट चष्म्यांची यादी येथे आहे. आम्ही येथे अनेक कंपन्यांचे अनेक प्रकारचे स्मार्ट ग्लासेस समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या भारतात खरेदी करण्यासाठी उपलब्ध असलेल्या काही सर्वोत्तम स्मार्ट चष्म्यांची यादी पहा.
स्पेक्टॅक्ल्स 3 बाय स्नॅपचॅट (Spectacles 3 by Snapchat)
हा स्मार्ट ग्लास थ्रीडी फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करू शकतो. त्याच्यासोबत चार्जिंग केसही देण्यात येते, म्हणजे प्रवासा दरम्यान चष्मा केसमध्ये ठेवल्यावर चार्ज होईल. या स्मार्ट चष्म्याची किंमत 29999 रुपये आहे.
बोस फ्रेम्स सोप्रानो (Bose Frames Soprano)
बोस ओपन इअर (Bose Frames Soprano) ऑडिओ सनग्लासेस आहे. या ग्लासेसमध्ये स्पीकर आहेत ज्याद्वारे तुम्ही 5.5 तासांपर्यंत गाणी ऐकू शकता. हे ग्लासेस एका तासात पूर्णपणे चार्ज होऊ शकतात. या सनग्लासेसमध्ये उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी, दृश्यमानता वाढवण्यासाठी आणि 99 टक्के घातक सुर्यकिरणांना ब्लॉक करण्यासाठी शटर आणि स्क्रॅच-प्रतिरोधक पोलराईज्ड लेन्स आहेत. याची ब्लूटूथ रेंज 30 फूट आहे. या ग्लासेसची किंमत 21990 रुपये आहे.
एक्सर्टेज ऑप्टिको एक्सझेड 01 Xertz Optio XZ01
हे स्मार्ट ग्लासेस स्पीकर आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येतात. यामध्ये वायरलेस हेडफोन आहेत. शिवाय 110mAh बॅटरी आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर सतत पाच तास गाणी ऐकता येते. यात यूव्ही संरक्षणासह पोलराईज्ड लेन्स देण्यात आले आहेत. तसेच, यामध्ये व्हॉईस असिस्टंट सपोर्ट आणि कॉलसाठी माईकही आहे.
संबंधित बातम्या :
- iPhone : मास्क घातल्यानंतही फेस आयडी वापरून आयफोन करा अनलॉक; काय आहे अॅपलचं नवं फिचर
- WhatsApp New Feature : आता वाढणार ग्रुप अॅडमिनची ताकद, तुम्हाला पाहिजे तेव्हा ग्रुपमधून कोणताही मेसेज डिलीट करू शकता
- What is Metaverse: ‘मेटाव्हर्स’ म्हणजे नेमकं आहे तरी काय? आपल्या आयुष्यावर याचा कसा परिणाम होऊ शकतो
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha