नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टानं भारतात व्हॉटस अॅप बॅन करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. या याचिकेत व्हॉटस अॅप बॅन करण्याची मागणी करण्यात आली होती. व्हॉटस अॅपची इंक्रिप्शन पॉलिसीवर आक्षेप घेत हरियाणाच्या आरटीआय कार्यकर्त्या सुधीर यादवने ही याचिका दाखल केली होती.

 

या याचिकेत म्हणण्यात आलं आहे की, 'व्हॉटस अॅपनं एप्रिल महिन्यात इंक्रीप्शन सुविधा सुरु केली आहे. यामुळे याची सिक्युरिटी तोडणं सोपं नाही. जर व्हॉट्स अॅपकडून कोणत्याही व्यक्तीचा डेटा जर सरकारनं मागवला तर ते या मेसेजला डिकोड करु शकणार नाही.'

 

या याचिकेत म्हटलं आहे की, 'या फीचरच्या मदतीनं कोणीही दहशतवादी अथवा अपराधी आपली योजनेबाबत व्हॉटसअॅप चॅट करु शकतात. तसंच यातून देशविरोधी कृत्यही घडू शकतं आणि त्याचा आमच्या सुरक्षा एजन्सीला पत्ताही लागणार नाही.'

 

याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की, 256-bit च्या मेसेजला डिकोड करण्यासाठी 100 हून अधिक वर्ष लागतील.