मुंबई : दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग भारतात 'मेक फॉर इंडिया' सेलिब्रेट करत आहे. कंपनी ग्राहकांना अनेक आकर्षक डील देत आहे. यामधील सर्वाधिक आकर्षक करणारी डील एक रुपयाची आहे. याअंतर्गत ग्राहक केवळ एक रुपया देऊन गॅलेक्सी नोट 5 किंवा गॅलेक्स S6 सारखे हायएंड स्मार्टफोन खरेदी करु शकतात.
एक रुपया देऊन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर ग्राहकांना सर्व पैसे 10 हफ्त्यांमध्ये द्यावे लागणार आहे. ही ऑफर अशा ग्राहकांसाठी आहे जे फर्स्ट पेमेंट ऑप्शनमध्ये बजाज फाईनसर्व्ह किंवा कॅपिटल फर्स्ट सिलेक्ट करतील. या डीलची सुरुवात 29 एप्रिलपासून झाली असून 15 मेपर्यंत चालणार आहे.
इथे ग्राहकांना 33,900 रुपयांमध्ये गॅलेक्सी S6 तर 42,500 रुपयांमध्ये गॅलेक्सी Note 5 मिळेल. तसंच कंपनी सर्व डेबिट/क्रेडिट कार्डवर 10 टक्के कॅशबॅकही देत आहे.
या डीलमध्ये गॅलेक्सी S6, गॅलेक्सी नोट 5, गॅलेक्सी A7, गॅलेक्सी A5 आणि गॅलेक्सी ग्रॅण्ड प्राईम 4G स्मार्टफोनचा समावेश आहे. फक्त स्मार्टफोनच नाही तर कंपनी टीव्ही, एसी आणि फ्रिजवरही ऑफर देत आहे. या डीलबाबत अधिक माहिती कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.