सॅमसंगच्या स्मार्टफोनवर जबरदस्त सूट, फ्लिपकार्टवर खास सेल
एबीपी माझा वेब टीम | 16 Apr 2016 07:36 AM (IST)
मुंबई: ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर सॅमसंग वीक सेल सुरु झाला आहे. या सेल दरम्यान सॅमसंगच्या अनेक स्मार्टफोन आणि डिव्हाइसवर खास ऑफर आणि डिस्काउंट देण्यात येत आहेत. फ्लिपकार्टवर सॅमसंग वीक 15 एप्रिल ते 21 एप्रिलपर्यंत सुरु असणार आहे. या सेलमध्ये गॅलक्सी कोअर प्राइम, गॅलक्सी नोट 4, गॅलक्सी S7 आणि गॅलक्सी S5 आणि नुकताच लाँच झालेला S7एज यासारख्या अनेक स्मार्टफोनवर डिस्काउंट मिळत आहे. या सेलमध्ये गॅलक्सी कोअर प्राइम रु. 5990 उपलब्ध आहे. तर दुसरीकडे नोट 4 वर तब्बल 7000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. तर S5 वर 6000 रु. डिस्काउंट देण्यात आलं आहे.याशिवाय गॅलक्सी ऑन 5 हा 7990 रु. आणि गॅलक्सी ऑन 7 हा 8,990 रु. उपलब्ध आहे. तर सॅमसंगनं नुकतचं लाँच केलेला S7 एज या स्मार्टफोनवर 50 टक्के सूट देण्यात आली आहे.