नवी दिल्ली : सॅमसंगने गॅलक्सी S9 आणि S9+ च्या लाँचिंगपूर्वी जुना फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलक्सी S7 एजच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. या फोनचं 32GB व्हेरिएंट सध्या 35 हजार 900 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने हा फोन खरेदी करता येऊ शकतो.

याशिवाय गॅलक्सी S7 एजच्या 128GB व्हेरिएंटची किंमत 37 हजार 900 रुपये करण्यात आली आहे.

सॅमसंगने S7 एज हा स्मार्टफोन मार्च 2016 मध्ये भारतात लाँच केला होता. त्यावेळी 32GB व्हेरिएंटची किंमत 56 हजार 900 रुपये ठेवण्यात आली होती. गेल्या दोन वर्षात या फोनच्या किंमतीत अनेकदा कपात करण्यात आली. सध्याची किंमत 35 हजार 900 रुपये आहे. आतापर्यंत एकूण 21 हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे.

लाँचिंगवेळी S7 एजला अँड्रॉईड मार्शमेलो 6.0 ओएस सिस्टम होती. मात्र या फोनला नंतर नॉगटची अपडेटही मिळाली. या स्मार्टफोनसाठी ओरियो 8.0 ही अपडेट मिळू शकते, अशीही चर्चा आहे.

गॅलक्सी S7 एजचे स्पेसिफिकेशन्स

  • 5.5 इंच आकाराचा QHD सुपर एमोलेड कर्व्ड डिस्प्ले (आयपी 68 सर्टिफाईड म्हणजे वॉटरप्रूफ स्क्रीन)

  • क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 क्वाडकोर (2.15 GHz ड्युअल कोर+ 1.6 GHz ड्युअल कोर) प्रोसेसर

  • 4 जीबी रॅम

  • 12 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

  • 3600mAh की बैटरी दी है.