मुंबई: सॅमसंगनं मागील वर्षी लाँच केला आपला शानदार स्मार्टफोन गॅलक्सी नोट 5 च्या किंमतीत भरघोस कपात केली आहे. आता 32 जीबी आणि 64 जीबी व्हेरिएंट मॉडेलमध्ये तब्बल 9000 हजारांची कपात करण्यात आली आहे. आता ३२ जीबी मॉडेल रु. 42,900 आणि 64 जीबी मॉडेल 48,900 रुपयात खरेदी करता येणार आहे.
किंमतीतील ही कपात सॅमसंगच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये करण्यात आली आहे. ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये 1440x2560 पिक्सल 5.7 इंच क्यूएचडी सुपर-एमोल्ड डिस्प्ले आहे. तसंच यामध्ये ऑक्टा-कोअर Exynos 7420 प्रोसेसरही आहे. फोर कोरटेक्स-A57 कोर्स 2.1GHz आणि फोर कोरटेक्स-A53 1.5GHz सोबत येणार आहे.
हा स्मार्टफोन दोन मेमरी वेरिएंटमध्ये आहे. 32 जीबी आणि 64 जीबी. मात्र यामध्ये मायक्रो एसडी कार्ड ऑप्शन देण्यात आलेला नाही. तसेच यामध्ये 4 जीबी रॅम देण्यात आला आहे. कंपनी सीईओच्या मते, सॅमसंगच्या आजवरच्या स्मार्टफोनपैकी हा सर्वाधिक रॅम असणारा स्मार्टफोन आहे. सॅमसंग गॅलक्सी नोट 5मध्ये 16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असून यात 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. तसंच यामध्ये 3000 mAh बॅटरी क्षमता आहे. 4जी, ब्ल्यूटूथ, वाय-फाय हे ऑप्शनही देण्यात आले आहेत.