मुंबई: मोबाइल कंपनी सॅमसंगनं अखेर आपला बजेट स्मार्टफोन गॅलक्सी J5 (2017) आणि गॅलक्सी J7 (2017) लाँच केले आहेत. मेटल डिझाइन असणाऱ्या J5 ची किंमत 279 युरो (जवळजवळ 19,000 रुपये) तर J7 ची किंमत 339 युरो (जवळजवळ 24,000 रुपये) आहे.


यासोबतच कंपनीनं गॅलक्सी J3 (2017) देखील युरोपीय बाजारात लाँच केला आहे. ज्याची किंमत 219 युरो (जवळजवळ 15,000 रुपये) आहे.

गॅलक्सी J5 आणि J7 हे दोन्ही स्मार्टफोन ब्लॅक आणि गोल्ड कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहेत. J5 हा स्मार्टफोन जूनच्या शेवटच्या आठवड्यात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. तर J7 ची विक्री जुलै महिन्यात सुरु होणार आहे.

J5 मध्ये ड्युल सिम सपोर्ट असून यामध्ये 7.0 नॉगट ओएस आहे. यामध्ये 5.2 इंच स्क्रीन असून याचं रेझ्युलेशन 720x1280 पिक्सल आहे. तसेच यामध्ये 1.6Ghz Exynos ऑक्टाकोअर प्रोसेसरसोबत 2 जीबी रॅम आहे.

यासोबतच यामध्ये 16 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली असून एसडी कार्डनं 256 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यात तब्बल 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. तर 13 मेगापिक्सलचाच रिअर कॅमेराही आहे.

या स्मार्टफोनमध्ये 3000 mAh बॅटरी आहे. तसेच 4G VoLTE, वाय-फाय, जीपीएस, ब्ल्यूटूथ, मायक्रो यूएसबी हे ऑप्शनदेखील आहेत.

सॅमसंग गॅलक्सी J7 मध्ये 5.5 इंच स्क्रीन देण्यात आली आहे. या स्मार्टफोनचे बरेचसे फीचर हे J5 प्रमाणेच आहेत. पण यात काही अपडेटेड फीचरही आहेत. J7 (2017) मध्ये 3 जीबी रॅम असणार आहे.