नवी दिल्ली : अमेझॉन सध्या सॅमसंगचे दोन स्मार्टफोन गॅलक्सी A8+ आणि On7 प्राईमवर सूट देत आहे. A8+ वर 4 हजार रुपयांची सूट मिळत असून हा फोन 28 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. याशिवाय On7 प्राईमवर 2 हजार रुपयांची सूट आहे. या फोनचं 32GB मॉडेल 10 हजार 990 रुपये आणि 64GB मॉडेल 12 हजार 990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

गॅलक्सी A8+ चे स्पेसिफिकेशन्स

6 इंच आकाराची स्क्रीन

4GB आणि 6GB रॅम व्हेरिएंट

32 GB आणि 64 GB स्टोरेज

A8+ (2018) ड्युअल सेल्फी कॅमेरा, 16 मेगापिक्सेल फिक्स्ड फोकस लेंस आणि दुसरा 8 मेगापिक्सेल का कॅमरा लेंस

16 मेगापिक्सेल चा f/1.7 अपर्चरचा रिअर कॅमेरा

2.2GHz+ 1.6GHz ऑक्टाकोर प्रोसेसर

3500mAh क्षमतेची बॅटरी



गॅलक्सी On7 प्राईमचे स्पेसिफिकेशन्स

7.1.1 अँड्रॉईड नॉगट सिस्टम

5.5 इंच आकाराची स्क्रीन

1.6GHz ऑक्टाकोर Exynos 7870 प्रोसेसर

3 GB रॅम/32 GB स्टोरेज आणि 4 GB रॅम/64 GB स्टोरेज व्हेरिएंट

13 मेगापिक्सेल रिअर आणि फ्रंट कॅमेरा

होम बटण फिंगरप्रिंट सेन्सर

3300mAh क्षमतेची बॅटरी