मुंबई : नोकिया 6 या स्मार्टफोनच्या 3GB रॅम व्हेरिएंटच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात हा फोन लाँच करण्यात आला होता. या फोनची लाँचिंग किंमत 14 हजार 999 रुपये होती.


आता या फोनच्या किंमतीत 1500 रुपयांची कपात करण्यात आली. त्यामुळे नव्या किंमतीसह हा फोन अमेझॉनवर उपलब्ध आहे. एचएमडी ग्लोबलने (MWC) 2018 मध्ये अँड्रॉईड वन नोकिया लाँच केला आहे. त्यानंतर या जुन्या व्हेरिएंटच्या किंमतीत कपात करण्यात आली.

नोकिया 6 स्मार्टफोनचे फीचर्स :

7.0 नॉगट सिस्टम

5.5 इंच आकाराची स्क्रीन

3 जीबी रॅम, 64 जीबी इंटर्नल स्टोरेज

3000mAh क्षमतेची बॅटरी

फिंगरप्रिंट सेन्सर होम बटन

16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

साऊंड क्वालिटीसाठी डॉल्बी अॅटमॉस आणि ड्युअल अॅम्प्लिफायर

संबंधित बातम्या :

भारतात एकाचवेळी नोकियाचे तीन स्मार्टफोन लाँच


नोकिया 6 स्मार्टफोनची विक्री सुरु


नोकिया 6 चं 4GB रॅम व्हेरिएंट लाँच, किंमत आणि फीचर्स