Tech News : Samsung Galaxy M21 2021 हा बजेट स्मार्टफोन कंपनीने बुधवारी भारतात लॉन्च केला आहे. मागील वर्षी लॉन्च झालेल्या Samsung Galaxy M21 2021 चं हे अपग्रेडेड वर्जन आहे. हा फोन आर्कटिक ब्लू आणि चारकोल ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे. प्राइम डे सेलचा (Prime Day Sale) भाग म्हणून 26 जुलैपासून मध्यरात्री 12 वाजता अॅमेझॉनवर हा फोन खरेदीसाठी उपलब्ध होईल. या स्मार्टफोनची विक्री Samsung.com आणि इतर ऑफलाईन विक्रेत्यांद्वारे देखील उपलब्ध केली जाईल.


Samsung Galaxy M21 2021 एडिशन स्मार्टफोनची किंमत 12,499 रुपये आहे. या फोनमध्ये 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे. तर फोनच्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14,499 रुपये आहे. Samsung Galaxy M21 2021 एडिशनच्या लॉन्च ऑफरबद्दल बोलायचं तर HDFC बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाईल.


Samsung Galaxy M21 2021 एडिशनमध्ये अँड्रॉइड 11 बेस्ड वन यूआय कोअर सिस्टम देण्यात आली आहे. याशिवाय यात 6.4 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. ज्याचा रिझोल्यूशन 1080x2340 पिक्सल आहे. फोनमध्ये ऑक्टाकोर Exynos 9611 प्रोसेसर, ग्राफिकसाठी Exynos 9611, 6 जीबी LPDDR4x रॅम आणि 128 जीबी पर्यंत स्टोरेज मिळेल.


कॅमेरा


फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये प्राइमरी लेन्स 48 मेगापिक्सल आहेत. सेकंडरी लेन्स 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड आणि थर्ड लेन्स 5 मेगापिक्सेल डीप्थ सेन्सर आहेत. प्रायमरी लेन्स सॅमसंगची ISOCELL GM2 आहे. सेल्फीसाठी यात 20 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.


बॅटरी


सॅमसंगने या हँडसेटमध्ये 6,000 एमएएच बॅटरी दिली आहे. यासह 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. Samsung Galaxy M21 2021 एडिशनचे इनबिल्ट स्टोरेज 128 जीबी आहे, जे मायक्रो एसडी कार्डद्वारे 512 जीबीपर्यंत वाढवले जाऊ शकते.


कनेक्टिव्हिटी


कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये 4 जी VOLTI, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस / ए-जीपीएस, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 मिमी हेडफोन जॅकचा समावेश आहे. फोनच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर आहे. सेन्सरमध्ये एक्सेलेरोमीटर, एंबियंट लाईट, जायरोस्कोप, मॅग्नेटोमीटर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सरचा समावेश आहे.