मुंबई : सॅमसंगनं गॅलक्सी J2 (2017) हा बजेट स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. ग्राहकांना हा स्मार्टफोन फक्त 7,350 रुपयात खरेदी करता येणार आहे. J सीरीजच्या या स्मार्टफोनसाठी कंपनीनं कोणताही लाँच इव्हेंट करण्यात आला नव्हता.

सॅमसंग इंडियाच्या वेबसाइटवर हा फोन अचानक लिस्ट करण्यात आला. पण हा फोन कधीपासून उपलब्ध असेल याबाबत कोणतीही माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही.

गॅलक्सी J2 (2017)मध्ये 4जी सपोर्ट असणार आहे. तसेच त्यासोबत अल्ट्रा डेटा सेव्हिंग मोडही असणार आहे. या फीचरमुळे बराच डेटाची बचत होते.

सॅमसंग गॅलक्सी J2 (2017) स्मार्टफोनचे खास फीचर :

या स्मार्टफोनमध्ये 4.7 इंच स्क्रिन देण्यात आली असून 540x960 पिक्सल रेझ्युलेशन आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमवर आधरित आहे.

तसेच यामध्ये 1.3GHz क्वॉड कोर Exynos प्रोसेसर आणि 1 जीबी रॅम देण्यात आलं आहे.

या स्मार्टफोमध्ये 8 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली असून एसडी कार्डनं मेमरी 128 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.

तसंच यामध्ये 5 मेगापिक्सल रिअर आणि 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यात 2000 mAh बॅटरीही देण्यात आली आहे.