नवी दिल्ली : सॅमसंगने गॅलक्सी J सीरिजचे J2 Ace आणि J1 4G हे दोन स्मार्टफोन भारतात लाँच केले आहेत. भारतात J2 Ace ची किंमत 8 हजार 490 रुपये, तर J1 4G ची किंमत 6 हजार 890 रुपये ठेवण्यात आली आहे.
J2 Ace ला 5 इंच आकाराची स्क्रीन, 1.4GHz क्वाडकोअर प्रोसेसर, 1.5 GB रॅम, 8 GB इंटर्नल स्टोरेज, 8 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, 2600mAh क्षमतेची बॅटरी असे फीचर्स देण्यात आले आहेत.
शिवाय अल्ट्रा डेटा सेव्हिंग मोड, एस बाईक मोड, टर्बो स्पीड अशा फीचर्सचा समावेश आहे.
J1 4G मध्येही चांगले फीचर्स देण्यात आले आहेत. 4.5 इंच आकाराची स्क्रीन, 1.3GHz क्वाडकोअर प्रोसेसर, 1 GB रॅम, 5 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 2 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि 2050mAh क्षमतेची बॅटरी असे फीचर्स देण्यात आले आहेत.