मुंबई : व्होडाफोनने नुकतीच रमजानच्या निमित्ताने खास ऑफर दिली होती. ज्यामध्ये 5 रुपयांपासून 786 रुपयांपर्यंतच्या ऑफर्सचा समावेश होता. आता आयडियानेही प्रीपेड ग्राहकांसाठी नवी ऑफर आणली आहे. 396 रुपयांच्या या ऑफरमध्ये ग्राहकांना 70 GB डेटा मिळणार आहे.
या ऑफरमध्ये आयडिया टू आयडिया मोफत लोकल एसटीडी व्हॉईस कॉलिंगही दिली जाणार आहे. तर 70 दिवसांसाठी 70 GB डेटा दिला जाईल. इतर नेटवर्कवर बोलण्यासाठी 3 हजार मिनिटे या ऑफरमध्ये मिळतील. तर दररोज 1 GB डेटा वापरण्याची मर्यादा असेल.
सप्टेंबर 2016 मध्ये जबरदस्त ऑफरसह दूरसंचार क्षेत्रात एंट्री करत रिलायन्स जिओने खळबळ माजवली. त्यानंतर ऑफर देण्याची कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु झाली. जिओच्या ऑफरनंतर अनेक कंपन्यांनी डेटा आणि व्हॉईस कॉलिंगसाठी आकर्षक ऑफर देणं सुरु केलं आहे.