मुंबई : सॅमसंग या लोकप्रिय दक्षिण कोरियाई कंपनीकडून मार्च महिन्यात ‘गॅलेक्सी A6+’ हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला होता. कंपनीने आता या फोनची किंमत दोन हजार रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे ‘गॅलेक्सी A6+’ ग्राहकांना 23,990 रुपयांत मिळेल.

नव्या किमतीसह ‘गॅलेक्सी A6+’ हा फोन अमेझॉन आणि पेटीएम मॉलवरही ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

पेटीएम मॉलवर या फोनवर अजून एक आकर्षक ऑफर देण्यात आली आहे. पेटीएम मॉलवर ‘गॅलेक्सी A6+’ च्या खरेदीवर तीन हजार रुपयांची कॅशबॅक मिळणार आहे.

कसा आहे सॅमसंग गॅलेक्सी A6+ ?

गॅलेक्सी A6+ हा ओरिओ अॅन्ड्रॉईड सिस्टमवर चालणारा ड्युअल सिम स्मार्टफोन आहे. या फोनचा आकार सहा इंच एवढा आहे. तर ‘गॅलेक्सी A6+’ मध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज देण्यात आलं आहे,जे 254 GB पर्यंत वाढवलं जाऊ शकतं.

या फोनच्या कॅमेराची चांगलीच चर्चा झाली होती. फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा दिला गेला आहे, ज्यामध्ये 16+5 मेगापिक्सलचं रिअर कॅमेरा कॉम्बिनेशन दिलं आहे. तर 24 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

‘गॅलेक्सी A6+’ हा स्मार्टफोन 32GB आणि 64GB अशा दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय या फोनमध्ये वाय-फाय, जीपीएस आणि सेंसर यांसारखे फीचरही देण्यात आले आहेत.