नवी दिल्ली : जपानमधील प्रसिद्ध सोनी कंपनी इतर कॅमेरा कंपनींना जबरदस्त टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे. डीएसएलआर कॅमेऱ्यालाही टक्कर देईल, अशा क्षमतेचा मिररलेस कॅमेरा सोनी कंपनीने लॉन्च केला आहे.
25x सुपर टेलिफोटो टेक्नॉलॉजी असणाऱ्या या कॅमेऱ्याला 20.1 मेगापिक्सेल जायस वाईरो-सोन्नार f2.4-4 चं लेन्स आहेत. ‘RX 10 मार्क III’ असं या कॅमेऱ्याचं नाव आहे.
या कॅमेऱ्यामध्ये BIONZ X इमेज प्रोसेसिंग इंजन लावण्यात आलं असून सपोर्टसाठी DRAM चिपचा वापर करण्यात आलं आहे. या चिपमुळे अधिकची मेमरी देण्यात आली आहे. या दोन्ही गोष्टींमुळे फोटो काढणाऱ्याला चांगला अनुभव येईल, असा सोनी कंपनीचा दावा आहे.
स्लो मोशन व्हिडीओ 1000 fps वर कॅप्चर करण्याची क्षमता या कॅमेऱ्यात असून, स्पोर्ट आणि वाईल्डलाईफ फोटोग्राफी करणाऱ्यांसाठी हा कॅमेरा अधिक उपयुक्त ठरु शकतो.
‘RX 10 मार्क III’ 4K व्हिडीओ आणि वाईड सेन्सिटिव्हिटी रेंजमध्ये ISO 64 पर्यंत क्षमता या कॅमेऱ्यात असून, यासोबत XGA OLED ट्रृ- फाइंडर इलेक्ट्रॉनिक व्हूफाइंडर 2.35 मिलीयन डाट्सच्या रिझॉल्युशनला सपोर्ट करतं.
सोनीचा ‘RX 10 मार्क III’ कॅमेरा इंग्लंडमध्ये एप्रिल महिन्यात लॉन्च झाला असून, मे महिन्यात अमेरिकेत लॉन्च केला जाणार आहे. सोनी कंपनीने या कॅमेऱ्याची किंमत अद्याप जाहीर केली नाही.