नवी दिल्ली : 251 रुपयांमध्ये स्मार्टफोन देण्याचा दावा करणारी रिंगिंग बेल्स कंपनी 1 जुलैपासून 10 हजार रुपयांहून कमी किंमतीत 32 इंचाचा एचडी LED टीव्ही लॉन्च करणार आहे.

 

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 32 इंचाचा हाय-डेफिनेशन एलईडी टेलिव्हिजन लॉन्च करण्याची तयारी रिंगिंग बेल्स कंपनीने केली आहे. या टीव्हीचं नावही ‘फ्रीडम’ ठेवण्यात आलं आहे.

 

गोयल यांनी सांगितले की, “फ्रीडम हा भारतातील सर्वात स्वस्त टीव्ही असणार आहे. कारण 10 हजार रुपयांहून कमी किंमतीचा एलईडी टीव्ही अद्याप भारतात उपलब्ध नाही. ऑनलाईन माध्यमातून या टीव्हीची विक्री होईल.”

 

विशेष म्हणजे, या टीव्हीसाठी ग्राहकांना फार काळ वाट पाहावी लागणार नाही. ऑनलाईन बुकिंगनंतर कॅश ऑन डिलिव्हरीवर एलईडी टीव्हीची विक्री केली जाणार आहे. यावेळी रिंगिंग बेल्स कंपनी स्मार्टफोन्सच्या अॅक्सेसरीजही लॉन्च करणार आहे.

 

251 रुपयांमध्ये जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन देण्याचं स्वप्न रिंगिंग बेल्स कंपनीने दाखवलं होतं, ते स्वप्न आता पूर्णही केलं जाणार आहे. 30 जूनपासून कॅश ऑन डिलिव्हरीवरुन स्मार्टफोनची ऑनलाईन विक्री सुरु केली जाणार आहे.