मुंबई : शाओमीने आज देशात Mi5 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शाओमीने Mi5 चा व्हाइट व्हर्जन स्मार्टफोन मार्चमध्ये लाँच केला होता. पण भारतामध्ये या मॅडेलचा 32 जीबीचे व्हर्जन लाँच करण्यात आले होते.
शुक्रवारी लाँच करण्यात आलेल्या स्मार्टफोनला बॅक आणि फ्रन्ट बाजूला ग्लास डिझाइन आणि मेटल फ्रेम देण्यात आली आहे. हा कंपनीचा पहिला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 चिपसेट असणारा स्मार्टफोन आहे. या 32 जीबी वारिएंटची किंमत 24,999 रुपये देण्यात आली आहे.
Mi5 मध्ये 5.15 इंचाची फुल HD स्क्रिन देण्यात आली आहे. ज्याची रिझॉल्यूशन कपॉसिटी 1080 x 1920 आहे. ज्याची पिक्सल डेन्सिटी 428 ppi (पिक्सल पर इंच) आहे. तसेच या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर देण्यात आला आहे. या कॉमेरा 16 मेगापिक्सलचा कॉमेरा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा कॅमेरा चारी दिशांना फिरणारा OIS ( ऑप्टिकल इनेज स्टेबलायझेशन) आहे. या फोनमध्ये 4 अल्ट्रामेगापिक्सलचा फ्रन्ट कॅमेरापण जोडण्यात आला आहे. हे दोन्हीही कॅमेरे f/2.2 अॅपचरने जोडण्यात आले आहेत.
या फोनमध्ये 3000mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच कनेक्टेविटीसाठी क्विक चार्जिंग, यूएसबी टाइप सी पोर्ट, वायफाय, 4G, ब्लूटूथ आणि NFC सारखे अॅप्लिकेशन देण्यात आले आहेत.