मुंबई: बेबी डस्टर अशी ओळख मिळवलेली क्विड कार रेनॉल्टसाठी फारच लाभदायक ठरली आहे. चांगले फीचर्स आणि कमी किंमत यामुळे अनेकांनी या कारला पसंती दिली. सप्टेंबर 2015 साली आलेली ही या कारची अवघ्या 17 महिन्यात 1.30 लाख युनिटची विक्री झाली आहे. क्विडच्या आधी डस्टर एसयूव्हीनं अशी कामगिरी केली होती.


कंपनीनं सुरुवातीला 0.8 सीसी इंजिन देण्यात आलं होतं. त्यानंतर 1.0 लीटर इंजिन देण्यात आलं. यासारखे अनेक बदल करुन क्विडनं ग्राहकांना कायम आकर्षित केलं.



रेनॉल्टनं जारी केलेल्या एका अधिकृत पत्रकानुसार, 2016च्या शेवटपर्यंत कंपनीची बाजारातील एकूण भागीदारी 4.5 टक्क्यांपर्यंत पोहचली होती. 2015च्या तुलनेत कंपनीच्या वाढीत तीन अंकांची वृद्धी झाली होती.

क्विडच्या धर्तीवर तयार करण्यात आलेली डॅटसन रेडी गो या कारनंही आतापर्यंत चांगलं प्रदर्शन केलं आहे.

सोर्स: कार देखो डॉट कॉम

Source: cardekho.com