मुंबई : दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर जिओ फोन 2 च्या पहिल्या फ्लॅश सेलचं आयोजन करत आहे. 16 ऑगस्टला दुपारी बारा वाजल्यापासून हा फोन खरेदी करता येईल. जिओचा हा नवा हायएंड फोन 2999 रुपयांमध्ये jio.com वर खरेदीसाठी उपलब्ध असेल.


जिओ फोन 2 हा मागील वर्षी लॉन्च झालेल्या जिओ फोनचं अपग्रेडड व्हेरिएंट आहे. या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे Qwerty कीबोर्ड आणि हॉरिझेंटल डिस्प्ले असेल. जिओने प्रत्येक भारतीयाला डिजीटल युगाचा अनुभव देण्यासाठी हा स्वस्त फोन लाँच केला आहे. या फोनमुळे जिओ फोन वापरणाऱ्यांची संख्या 10 कोटींच्या पुढे जाईल, अशी कंपनीला अपेक्षा आहे.

जिओ फोन 2 मध्ये फेसबुक, यूट्यूब आणि गुगल मॅप यांसारख्या सुविधा मिळतील. या फोनमध्ये व्हॉट्सअॅप असेल, असाही दावा कंपनीने केला आहे. यापूर्वीही जिओने ग्राहकांना मोफत कॉलिंग, जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ चॅट यांसारख्या सुविधा दिल्या आहेत.

जिओ फोन 2 चे स्पेसिफिकेशन

यामध्ये Qwerty कीबोर्ड आणि हॉरिझेंटल डिस्प्ले असेल. ड्युअल सिम, 2.4 इंच आकाराची स्क्रीन, ओएस सिस्टम, 2000 एमएएच क्षमतेची बॅटरी, 512 एमबी रॅम आणि चार जीबी इनबिल्ट स्टोरेज, लाऊड मोनो असे फीचर्स देण्यात आले आहेत.

या फोनमध्ये दोन मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि 0.3 मेगापिक्सेल व्हीजीए फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय, जीपीएस, एफएम, एनएफसी VoLTE आणि VoWiFi असे फीचर्स देण्यात आले आहेत.