मुंबई: चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीनं आपल्या ग्राहकांना अधिक डेटा देण्यासाठी रिलायन्स जिओशी हातमिळवणी केली आहे. शाओमी यूजर्सला रिलायन्स जिओच्या नेटवर्कवर 30 जीबी 4G डेटा मोफत मिळणार आहे.
रिलायन्स जिओची ही एक्स्ट्रा डेटा ऑफर ही रेडमी 2, रेडमी 2 प्राइम, रेडमी नोट 4G, रेडमी नोट 4G प्राइम, Mi 4i, रेडमी नोट 2, Mi 5, Mi Max Prime, रेडमी 3s, रेडमी 3s प्लस, रेडमी 3s प्राइम, रेडमी नोट 4, रेडमी नोट 4A वर मिळणार आहे.
मोफत डेटा मिळवण्यासाठी या स्मार्टफोनच्या यूजर्संना आपल्या फोनमध्ये 16 जूनपासून रिलायन्स जिओचं सिम अॅक्टिव्हेटेड असणं गरजेचं आहे. या ऑफरमध्ये शाओमी यूजर्सला प्रत्येक रिचार्जवर 5 जीबी 4जी अतिरिक्त डेटा मिळणार आहे. तसेच हा अतिरिक्त डेटा मार्च 2018 पर्यंतच्या 6 रिचार्जवर मिळेल. त्यामुळे प्रत्येक शाओमी यूजरला 30 जीबी फ्री डेटा मिळणार.
कसा मिळवाल फ्री डेटा
- ही ऑफर अॅक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला MyJio अॅप इंस्टॉल करावं लागणार आहे.
- My Jio अॅपमध्ये माय वॉउचर ऑप्शनमध्ये जा.
- यानंतर रिचार्ज माय नंबरवर क्लिक करा. आणि रिचार्ज करा.
- त्यानंतर तुम्हाला रिचार्ज सक्सेसफुल झाल्याचं नोटिफिकेशन येईल.
- त्यानंतर 5 जीबी अतिरिक्त डेटा 48 तासात तुम्हाला मिळेल.