मुंबई : रिलायन्स जिओ आता सिमनंतर फीचर फोनने धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहे. रिलायन्स 4G VoLTE फीचर फोन 21 जुलैला लाँच करणार असल्याची माहिती आहे. कारण या दिवशी रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच बैठकीत फोन लाँच केला जाणाची शक्यता आहे.


फीचर्स काय असतील?

  • ‘टेक पीपी’च्या लीक रिपोर्टनुसार हा फोन रिलायन्सच्या LYF ब्रँडअंतर्गत येईल. या 4G VoLTE फीचर फोनमध्ये 2.4 इंच आकाराची स्क्रीन असेल.

  • 512 MB रॅम

  • 4 GB इंटर्नल स्टोरेज

  • ड्युअल सिम स्लॉट

  • 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि VGA फ्रंट कॅमेरा

  • 2000mAh क्षमतेची बॅटरी

  • ब्ल्यूटूथ आणि व्हिडिओ कॉलिंग सपोर्ट


काही रिपोर्टनुसार यामध्ये ‘KAI ओएस’ असेल. जे फायरफॉक्सचं कस्टमाईज व्हर्जन आहे. शिवाय यामध्ये हॉटस्पॉट टेदरिंगचाही पर्याय असेल. ज्यामुळे तुम्ही एका फोनवरुन अनेक फोनवर इंटरनेटचा वापर करु शकता.

Photo : Tech PP

केवळ 500 रुपये किंमत

21 जुलैला लाँच होणाऱ्या या 4G VoLTE फीचर फोनची किंमत 500 रुपये असेल, अशी माहिती आहे. ‘द इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार या फोनची किंमत 500 रुपये आहे. जिओच्या फोनची किंमत 500 रुपये असेल, 2G ग्राहकांपर्यंत 4G सेवा पोहचवण्यासाठी ही किंमत ठेवण्यात आली आहे, असं HSBC चे टेलीकॉम अॅनालिस्ट राजीव शर्मा यांनी म्हटलं आहे.