मुंबई : इंटरनेट स्पीडची तपासणी करणारी फर्म ओपनसिग्नलनं एअरटेल भारतात सर्वात वेगवान 4G डेटा पुरवणारी कंपनी असल्याचं म्हटलं आहे. तर ओपनसिग्नलच्या चाचणीत जिओ ही चौथ्या क्रमांकावर आहे.
ओपनसिग्नलनं या चाचणीनं ट्रायच्या 4G टेस्टिंग प्रणालीला एक प्रकारंच आव्हानच दिलं आहे. कारण की, ट्रायनं आपल्या चाचणीमध्ये जिओचं इंटरनेट नेटवर्क सर्वात वेगवान असल्याचं सांगितलं होतं.
ओपनसिग्नलनं आपल्या वेबसाइटवर एक ब्लॉग पोस्ट केला आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे की, 'एअरटेलचा सरासरी पिकअप स्पीड 56.6 mbps आहे. तर 4G डाऊनलोड स्पीड 11.5 mbps पेक्षा पाचपट जास्त आहे.' याची चाचणी 1 डिसेंबर 2016 ते 28 फेब्रुवारी 2017 मध्ये दिल्ली आणि मुंबईसह अनेक शहरांमध्ये करण्यात आली.
या रिपोर्टमध्ये ओपनसिग्नलनं जिओ नेटवर्कचा सरासरी 4G स्पीड सर्वात कमी 3.9 mbps आहे.
(ही चाचणी opensignalनं केली आहे.)
4G स्पीडमध्ये एअरटेल नंबर वन, जिओ शेवटच्या स्थानी : ओपनसिग्नल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Jul 2017 03:36 PM (IST)
जिओच्या लाँचिंगनंतर सर्वच टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, आता एका सर्व्हेमुळे एअरटेलला मोठा दिलासा मिळाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -