रिलायन्स डिजिटलचे सध्या भारतीय बाजारात चार स्मार्टफोन अर्थ, विंड, वॉटर आणि प्लेम हे आहेत. हा आता कंपनीचा पाचवा स्मार्टफोन आहे.
स्पेशल एडिशन असल्यानं याबरोबर काही खास ऑफर्स देण्यात आल्या आहेत. LYF F1सोबत कंपनी ब्ल्यूटूथ स्पीकर आणि सिटी बँक यूजर्सला 10 टक्के कॅशबॅक देणार आहे.
LYF F1 स्मार्टफोनचे खास फीचर्स:
5.5 इंच स्क्रीन आणि 1920x1080 पिक्सल
कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन
स्नॅपड्रॅगन 617 चिपसेट आणि 3 जीबी रॅम
32 जीबी इंटरनल मेमरी, 128 जीबीपर्यत मेमरी वाढविता येऊ शकते.
16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
3200 mAh बॅटरी क्षमता