आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 4G पॅक, 100 रुपयांत 10 जीबी डेटा
एबीपी माझा वेब टीम | 06 May 2016 01:31 PM (IST)
मुंबई : अनिल अंबानीच्या रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी अत्यंत आकर्षक इंटरनेट प्लॅन आणलं आहे. आरकॉमचं हा प्लॅन आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 4G पॅक असणार आहे. आरकॉमच्या या प्लॅननुसार रिलायन्सच्या सीडीएमए ग्राहकांना 93 रुपयांपासून 97 रुपयांपर्यंतच्या किंमतीत तब्बल 10 जीबी 4G इंटरनेट डेटा मिळणार आहे. या प्लॅनमधून ग्राहकांना 150 मिनिट फ्री व्हॉईस कॉलिंगही मिळणार आहे. मात्र, या प्लॅनसाठी ग्राहकांना जीएसएममध्ये सब्सक्रीप्शन घ्यावं लागेल आणि 4G हँडसेट खरेदी करावं लागणार आहे. रिलायन्स कम्युनिकेशन आरकॉमने हा प्लॅन सध्या 9 सर्कलमध्ये लॉन्च केला आहे. यामध्ये आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश (पूर्व भाग), उत्तर प्रदेश (पश्चिम भाग), मध्यप्रदेश, गुजरात, दिल्ली आणि कोलकाता यांचा समावेश आहे. आरकॉमच्या या प्रमोशनल 4G प्लॅन आतापर्यंतचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे.