नवी दिल्ली : शाओमीने बजेट स्मार्टफोन 'रेडमी 5A' लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन 'रेडमी 4A'चा अॅडव्हान्स मॉडेल असेल. मेटल बॉडी असणारा हा स्मार्टफोन 137 ग्रॅम वजनाचा आहे.


'रेडमी 5A' स्मार्टफोनचं खास वैशिष्ट्य म्हणजे एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 8 दिवस स्मार्टफोनला चार्जिंगची आवश्यकता नाही, असा दावा शाओमीने केला आहे.

चीनमधील मोबाईल बाजारात शाओमीने 'रेडमी 5A' स्मार्टफोन 599 युआनमध्ये (सुमारे 6000 रुपये) आणला आहे. चीनमधील बाजारात सोमवारी प्री-ऑर्डर सुरु होणार आहे.

रेडमी 5A स्मार्टफोनमध्ये रेडमी 4A च्या तुलनेत जास्त बदल करण्यात आले नाही.

रेडमी 5A’ स्मार्टफोनचे फीचर्स :

  • 5 इंच स्क्रीन

  • 720×1280 पिक्सेल रिझॉल्युशन

  • 4GHz क्वाड कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 प्रोसेसर

  • 2 जीबी रॅम

  • 16 जीबी मेमरी

  • 128 जीबीपर्यंत मेमरी वाढवण्याची सुविधा

  • 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा

  • 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

  • 4G कनेक्टिव्हिटी VoLTE

  • जीपीआरएस

  • WiFi


रेडमी 5A MIUI 9 ओएस असणारा या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम आहे. 3000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.