मुंबई : 'शाओमी रेडमी 5'ची उत्सुकता जगभरातील स्मार्टफोनप्रेमींमध्ये दिसून येत होती. सोशल मीडियावरुन सातत्याने या फोनच्या लॉन्चिंगबाबत विचारणा होत होती. अखेर 'शाओमी रेडमी 5'च्या लॉन्चिंगची तारीख ठरली आहे. भारतीय ग्राहकांसाठी तर शाओमीने स्मार्टफोन खरेदीसाठी आणखी सोपा मार्ग दिला आहे.


उद्या (14 मार्च) 'शाओमी रेडमी 5' स्मार्टफोन लाॉन्च होणार आहे. ग्राहकांमधील उत्सुकता कायम राहावी म्हणून शाओमी कंपनीकडून या स्मार्टफोनच्या फीचर्सबाबत अद्याप कोणतीही माहिती उघड करण्यात आली नाही.

भारतीय ग्राहकांसाठी शाओमीने ऑनलाईन मार्ग दिला आहे. अमेझॉन इंडियाच्या वेबसाईटवरुन 'शाओमी रेडमी 5' स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.

एमआय डॉट कॉमवरुन या स्मार्टफोनच्या लॉन्चिंगचा सोहळा लाईव्ह टेलिकास्ट केला जाणार असल्याची माहिती मिळते आहे.

याआधी शाओमीच्या 'रेडमी 4' स्मार्टफोनला भारतीयांनी अधिक पसंती दिली होती. याच स्मार्टफोनचं पुढचं पाऊल म्हणजे 'शाओमी रेडमी 5' असेल. त्यामुळे या स्मार्टफोनबद्दल उत्सुकता नक्कीच अधिक आहे. शिवाय, कंपनीने या नव्या स्मार्टफोनचा टीझरसुद्धा समोर आणला नाही. एकंदरीत शाओमीने जाणीवपूर्वक उत्सुकता ताणून धरायला लावली आहे.

'शाओमी रेडमी 5' स्मार्टफोन चीनमध्ये डिसेंबर महिन्यातच लॉन्च करण्यात आला आहे. आता आंतरराष्ट्रीय बाजारात दाखल होईल.

'शाओमी रेडमी 5'चे फीचर्स जाहीर करण्यात आले नसले, तरी मोबाईल बाजारातील तज्ज्ञांच्या मते खालील फीचर्स असण्याची शक्यता आहे. किंबहुना, जवळपास हेच फीचर्स असतील, असे मानले जात आहे. पाहूया ते फीचर्स कोणते आहेत :

- 5.7 इंच एचडी प्लस डिस्प्ले
- स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसर
- 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
- 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 3300 mAh क्षमतेची बॅटरी
- अँड्रॉईड 7.1 नोगट (MIUI)

'शाओमी रेडमी 5' स्मार्टफोन एकूण तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल.

- 2 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज
- 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज
- 4 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज

तीनही व्हेरिएंटच्या किंमती 8 हजारांपासून 11 हजार रुपयांच्या दरम्यान असतील, असाही अंदाज वर्तवला जात आहे. अर्थात, आता उद्या म्हणजे 14 मार्च रोजीच या स्मार्टफोनचे नेमके फीचर्स आणि नेमक्या किंमती समोर येतील. त्यामुळे स्मार्टफोनप्रेमींना अजून 24 तास वाट पाहावी लागणार आहे.