Tech News : आजपासून ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर Big Saving Days सेल सुरू झाला आहे. 16 जूनपर्यंत सुरू असलेल्या या सेलमध्ये अनेक बड्या कंपन्यांच्या स्मार्टफोनवर सूट देण्यात येत आहे. जर आपण विक्रीच्या सर्वात चांगल्या डीलबद्दल बोलायचं तर Realme X7 Max 5G वर एक चांगली ऑफर दिली जात आहे. फ्लिपकार्टच्या म्हणण्यानुसार, फ्लिपकार्ट स्मार्ट अपग्रेडअंतर्गत 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेजचा फोन फक्त 18,910 रुपयांमध्ये मिळू शकतो. या फोनची किंमत लॉन्चच्या वेळी 26,999 रुपये होती. फोनवर आठ हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.


स्पेशिफिकेशन 


Realme X7 Max 5G स्मार्टफोनमध्ये 6.43-इंचाचा एचडी + एमोलेड डिस्प्ले आहे, ज्याचा रिझोल्यूशन 2400x1080 पिक्सल आहे. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड रियलमी UI 2.0 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 1200 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. यात 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोनची मेमरी आपण मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवू शकतो.


कॅमेरा


फोटोग्राफीबद्दल सांगायचे तर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप Realme X7 Max 5G फोनमध्ये देण्यात आला आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा सोनी आयएमएक्स 682 सह 64 मेगापिक्सलचा आहे. तर 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड एंगल लेन्स देण्यात आला आहे. तर 2 मेगापिक्सेलची मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.


4500mAh बॅटरी


Realme X7 Max 5G स्मार्टफोनमध्ये पॉवरसाठी 4500 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 50W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. कंपनीच्या म्हणण्यानुसार फोनची बॅटरी फक्त 16 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. कनेक्टिव्हीटीसाठी फोनमध्ये 5 जी, वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट अशी सुविधा देण्यात आली आहे.


Realme X7 Max 5G ची Vivo V20 Pro शी स्पर्धा 


Vivo V20 Pro हा स्मार्टफोन 29,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह सिंगल व्हेरिएंट असेल. यात 6.44 इंचाचा फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले आहे, ज्याचा रिझोल्यूशन 1080x2400 पिक्सल आहे. हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765 जी प्रोसेसर आणि Android 11 वर कार्य करतो. मेमरी कार्डद्वारे याची मेमरी वाढवता येते. फोनमध्ये 4000 mAh ची बॅटरी आहे. या मोबाईलमध्ये तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. यात प्रायमरी सेन्सर 64 मेगापिक्सल, दुसरा सेन्सर 8 मेगापिक्सल, तिसरा 2 मेगापिक्सलचा सेन्सर आणि फ्रंटसाठी कॅमेऱ्यासाठी ड्युअल सेन्सर आहे. ज्यामध्ये पहिला सेन्सर 44 मेगापिक्सलचा आणि दुसरा सेन्सर 8 मेगापिक्सलचा आहे.